आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घाेटाळा; अाता डीनचा मृत्यू, अातापर्यंत गेले ४५ जणांचे प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ/जबलपूर - मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यू प्रकरणांचे वृत्तांकन करणा-या पत्रकाराच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग न्यूजमधून हटत नाही तोच आणखी एक मृत्यू झाला. जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण शर्मा दिल्लीतील एका हॉटेलमध्ये संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांतच या दोघांचा मृत्यू झाल्याने काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढवला आहे.

व्यापमं घोटाळ्यात आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त आरोपी अथवा चौकशीशी संबंधित लोकांचे मृत्यू होत आहेत. ‘आज तक’ चे शोध पत्रकार अक्षय सिंह या प्रकरणातील आरोपी असलेल्या वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी नम्रता डामोरच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या मेघनगर (झाबुआ) येथील घरी गेले होते. तेथे त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. आता जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण शर्मा दिल्लीच्या द्वारका भागातील एका हाॅटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. शर्मा एसटीएफच्या मदतीसाठी कागदपत्रे गोळा करत होते. रविवारी ते आगरतळा येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाणार होते. शर्मा यांची खोली उर्वरित. पान १२

आतून बंद होती. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला. त्यांच्या बिछान्याजवळ व्हिस्की आणि काही औषधे आढळली. शर्मा मधुमेह आणि नैराश्याने ग्रस्त होते.
वर्षभरात जबलपूरच्या दुस-या अधिष्ठात्याचा मृत्यू :
एक वर्षाच्या आतच जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुस-या अधिष्ठात्याच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. अरुण शर्मा जूनमध्ये रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखपदावरून अधिष्ठाता झाले होते. ते बालाघाटचे माजी खासदार नंदकिशोर शर्मा यांचे चिरंजीव होते. बरोबर एक वर्षापूर्वी चार जुलैलाच अधिष्ठाचा डी. के. साकल्ला यांचा घराला लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या कार्यकाळात व्यापमं घोटाळ्याशी संबंधित अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढण्यात आले होते.