आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vyapam Scam: Petitions Hearing Tomorrow In Supreme Court

व्यापमं घोटाळ्याशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यापमं घोटाळ्याशी संबंधित दाखल चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात नऊ रोजी सुनावणी होणार आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि तीन व्हिसल ब्लोअर्स अशीष, चतुर्वेदी,डॉ.आनंद राजय आणि प्रशांत पांडे यांनी या याचिका दाखल केल्या होत्या.

दरम्यान,दिग्विजय सिंह यांनी सीबीआय चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केल्यावरच सत्य समोर येईल,असे म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते आणि माकपा सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही ही मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालय राज्यपाल रामनरेश यादव यांना बडतर्फ करण्याच्या याचिकेवरही सुनावणी करणार आहे.

व्यापमं घोटाळा मोठा मुद्दा नाही : गौडा
केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी व्यापमं घोटाळ्यावर पंतप्रधानांनी निवेदन करण्याएवढा हा मुद्दा नसल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावरून वाद उद्भवल्यानंतर त्यांनी आपले म्हणणे ललित मोदीशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यांनी सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीचे स्वागत केले.