नवी दिल्ली - प्रीती झिंटाने आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबमधील स्वतःची भागीदारी विकून अमेरिकेला जाणार असल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे. प्रीतीने बुधवारी उशिरा रात्री ट्विट केले. त्यात म्हटले आहे, 'तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्याचे मला आश्यर्य वाटत आहे. नाही, मी माझी भागीदारी विकणार नाही, आणि मी अमेरिकेत स्थायीक देखील होणार नाही.' आयपीएल टीमची भागीदारी विकण्याच्या वृत्ताचे खंडन केल्यानंतर प्रीती लिहिते, 'तथाकथित सुत्र काहीही सांगतात आणि त्यांच्या हवाल्याने बातम्या तयार होतात. कृपया ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये. भारतात इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहे, ज्यांच्या बातम्या होऊ शकतात.'
एका इंग्रजी दैनिकाने प्रीतीच्या वकिलांच्या हवाल्याने वृत्त प्रकाशित केले होते,की ती नेस वाडियाविरोधातील तक्रार मागे घेण्याच्या विचारात आहे. तसेच पंजाब संघातील भागीदारी विकून अमेरिकेतच राहाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रीतीने हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, प्रीती झिंटा-नेस वाडिया वादात अंडरवर्ल्डची एंट्री