आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Want My Wagon R Back', Says UK Based AAP Supporter To Arvind Kejriwal

नाराज कार्यकर्त्यांनी केजरींना परत मागितली व्हॅगनआर कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून मोहभंग झालेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली व्हॅगनआर कार परत मागितली आहे. त्याचबरोबर पक्षाच्या कामासाठी दिलेली बाइक, पक्षनिधीतील रक्कमही त्यांनी परत मागितली आहे. याच गाडीतून केजरीवाल यांनी विधानसभेत पक्षाचा प्रचार केला होता.

आपच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या इंनिंगपासून ही कार केजरीवाल यांची ओळख बनली होती. ही कार कुंदन शर्मा यांच्या पत्नीच्या नावाने नोंदवण्यात आलेली आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय प्रकरणांसंबंधी समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टीने कुंदन नाराज आहेत.

शांती भूषण यांनी दिली घर सोडण्याची धमकी
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यातील वादाला आपच्या माजी प्रवक्त्या आतिशी मारलेना यांनी मंगळवारी नवे वळण दिले. दोन्ही गटांत समझौता होणार होता, परंतु ऐनवेळी प्रशांत भूषण यांनी माघार घेतली. वडील शांती भूषण आपल्या भूमिकेवर ठाम होते. केजरीवाल गटाशी तडजोड केल्यास आपण घर सोडून देऊ, अशी धमकी शांती भूषण यांनी मुलास दिली होती. त्यामुळे प्रशांत यांचा नाइलाज झाल्याचा दावा मारलेना यांनी केला.