आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अवमान प्रकरणी केजरीवालांविरोधात आसाम कोर्टाचे वॉरंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आसामच्या एका कोर्टाने वॉरंट बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कथित वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी गतवर्षी केजरीवाल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात कोर्टाने हा वॉरंट बजावला.
 
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना सुनावणीत हजर राहण्यात अपयशी ठरल्याबद्दल आसामच्या न्यायलयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजावला. याबाबत सविस्तर वृत्त असे की आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर सवाल उपस्थित करणारे ट्वीट केले होते. त्यावर संतप्त आसाम भाजपचे नेते सूर्य रोंगफर यांनी केजरीवाल यांच्या डिसेंबरमध्ये मानहानीचा खटला दाखल केला. या खटल्यात दिल्लीच्या स्थानिक निवडणुका आणि इतर कारणे देऊन केजरीवाल वेळोवेळी अनुपस्थित राहिले. केजरीवाल यांच्या वकिलांनी दिलेली सर्व कारणे फेटाळून लावत न्यायालयाने आता त्यांच्या विरोधात वॉरंट जाहीर केला आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...