आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Was Never Involved In Wrongdoing: Raina, Latest News In Marathi

सुरेश रैनाने फेटाळला सट्टेबाजीचा आरोप, म्हणाला- ललित मोदीना खेचेल कोर्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केलेला सट्टेबाजीचा आरोप टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने फेटाळला आहे. आरोप करणार्‍या ललित मोदींना आपण कोर्टात खेचणार असल्याचे रैनाने म्हटले आहे.

'आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजीत माझा सहभाग असल्याची चर्चा काही दिवसांपासून मीडियात सुरु आहे. परंतु, मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. मी नेहमी देशासाठी जिव ओतून खेळत आहे.' असे रैनाने म्हटले आहे.

'कधीही सट्टेबाजीत सहमागी झालो नाही'
रैनाने सांगितले की, तो कधीही आयपीएलमधील सट्टेबाजीत सहभागी झाला नाही. क्रिकेट खेळणे हा माझा ध्यास आहे. मग तेव्हा मी कोणत्याही संघाकडून खेळत आहे, याकडे पाहात नाही. मी देशासाठी क्रिकेट खेळतो. माझ्यावर मोदींनी जे आरोप केले आहेत, ते निराधार असून आपण मोदींना कोर्टात खेजण्यासंदर्भात विचार करत आहोत.

असे आहे सगळे प्रकरण..
ललित मोदी यांनी 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पाठवलेल्या एका ई-मेलचा खुलासा झाला आहे. भारतीय उद्योगपती बाबा दीवानकडून काही क्रिकेटपटूंना लाच दिली जात असल्याची माहिती मोदींनी या ई-मेलद्वारे दिल्याचे आयसीसीने म्हटले आहे. मोदींनी शनिवार (27 जून) आपल्या ट्वीटमध्ये ई-मेलचा उल्लेख केला होता. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि ड्वेन ब्रावो सट्टेबाजांना मदत केल्याचे मोदींनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले होते.

दुसरी, सुरेश रैना, रवींद्र जाडेजा व ड्वेन ब्रावो यांनी आयपीएलमध्ये एकूण 60 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ललित मोदींचा आरोप बीसीसीआयने फेटाळला आहे. आयसीसीच्या चौकशीतूनही सत्य बाहेर येईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

दरम्यान, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी शनिवारी एक मोठा खुलासा करून भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली होती.मोदी यांनी चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि सुरेश रैनावर इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सट्टेबाजीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. ललित मोदी यांनी आपल्या 'ट्वीट' एक पत्र पोस्ट केले होते. मोदींनी हे पत्र 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांना पाठवले होते.

श्रीनिवासनचे जावई मयप्पन, राज कुंद्रावरही आरोप
टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना, ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावोचा (वेस्ट इंडीज) 'रियल एस्टेट टायकून' बाबा दीवान आर्थिक संबंध आहेत. बाबा दीवान हा क्रिकेटपटूंना लाच देत असल्याचा आरोप ललित मोदी यांनी दिला होता. तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा यांच्यासोबतही दीवान यांचे चांगले संबंध आहेत. हे सर्व क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करतात, असा आरोप मोदींनी केले आहे.