आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Was Yakub Memon Cheated By Indian Investigation Authorities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याकूब मेमनसोबत अटकेनंतर भारतीय तपास यंत्रणांनी केला विश्‍वासघात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 1993च्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्‍यात आलेला याकूब मेमनला भारतीय तपास यंत्रणांनी खोटी आश्‍वासने देऊन जाळ्यात अडकविले होते का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकूब हा बॉम्‍बस्‍फोटाचा सुत्रधार टायगर मेमनचा छोटा भाऊ आहे. त्‍याला धोक्‍याने अटक करण्‍याचा मुद्दा पुन्‍हा उफाळून आला आहे.

माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. याकूबला माफीचा साक्षीदार बनविण्‍याचे खोटे आश्‍वासन देऊन अटक करण्‍यात आली होती. परंतु, तपास यंत्रणांनी त्‍यालाच अडकविले आणि आता त्‍याला फाशीची शिक्षा दिली. यामुळे मुख्‍य सुत्रधार टायगर मेमनला पकडण्‍यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्‍या, असे सिंह म्‍हणाले.