आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढील वर्षी देशात नदीतून जल वाहतूक सुरू होणार. ब्रिटनकडून ७० हॉवरक्राफ्ट घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ट्रॅफिकला रस्तेमार्गाऐवजी पाण्यातून वाट काढून देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे मोठी महानगरे, छोट्या शहरांतील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. रस्ते वाहतूक जलमार्गाने वळवण्याच्या योजनेवर काम सुरू झाले असून पुढील वर्षांपर्यंत दिल्लीहून आग्रापर्यंत यमुनेत रिव्हर बस चालणार आहे.

इनलँड वॉटरवेज अॅथॉरिटी ऑफ द इंडियाने या योजनेवर काम सुरू केले आहे. ब्रिटनच्या कंपनीकडून ७० होव्हरक्राफ्ट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संरक्षण मंत्रालय, गोवा शिपयार्ड, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नद्या, तलाव, समुद्र, कालवे, बॅरेजसमध्ये वॉटर टर्मिनल बनवण्यासाठी नेदरलँड सरकार तांत्रिक सहकार्य करणार आहे.
पुढील तीन महिन्यांत १०१ नद्या, तलाव बॅकवाटॅरमध्ये
वाहतुकीसाठी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. रस्ते, परिवहन व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी ही योजना केवळ कागदोपत्री राहणार नाही, असा दावा केला आहे. दोन वर्षांत लोक या योजनेला आजच्या मेट्रोसारखेच सरावलेले असतील
रस्तेमार्गापेक्षा ३ पट स्वस्त
{जलमार्गाने वाहतुकीसाठी खर्च प्रतिकिलोमीटर ५० पैसे खर्च येतो. ट्रेनने १ रुपया व रस्तेमार्गे १.५० पैसे खर्च येतो.
{शहरांत लिंक रोड रस्त्यांच्या जागी नद्यांपर्यंत जातील. नद्यांमध्ये रिव्हर बस चालतील. विमानतळांसाठी हेलिकॉप्टरसारखे सी - प्लेन चालतील. त्याचे भाडे लक्झरी टॅक्सी इतके असेल.
४२०० कोटी खर्चून ७ राज्यांत होणार जलमार्ग
जलमार्ग वाहतुकीसाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार आदी राज्यांनी त्याला सहमती दिली आहे. इतर राज्यांसाेबतही बोलणी सुरू आहे. वॉअरवेज अॅथॉरॉटीला जलमार्ग विकसित करण्यासाठी या वर्षी ४२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

काम कठीण नाही, पावसात गाळ काढणे गरजेचे : तज्ज्ञ
^ जलमार्गच्या रुटवर पुरेसे पाणी राहील, याची काळजी घ्यावी लागेल. पावसाळ्यात नद्यांमध्ये येणारा गाळ नियमितपण काढावा लागेल.
प्रो. नारायण रंगराजन, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर

^ नदी, ओलांडण्यास वॉटर मोटारचा वापर याआधीदेखील झाला आहे. त्यामुळे हे काम कठीण मुळीच नाही. पण नद्या स्वच्छ कराव्या लागतील.
जी. रघुराम, आयआयएम अहमदाबादचे प्रोफेसर
(दोन्ही तज्ज्ञांनी इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टच्या व्यावहारिकतेवर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे.)
बातम्या आणखी आहेत...