आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WC Notices To Kumar Vishwas In Extramarital Affairs Case

कुमार विश्वास यांच्यावर अनैतिक संबंधांचा आरोप, महिला आयोगाची Notice

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनैतिक संबंधांच्या आरोपावरून दिल्लीच्या महिला आयोगाने आम आदमी पार्टचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. महिलेने केलेल्या तक्रार प्रकरणी हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. आरोप करणारी महिला ही आपचीच कार्यकर्ता असून लोकसभा निवडणुकीत तिने कुमार विश्वास यांच्याबरोबर अमेठीत प्रचार केल्याचेही सांगितले जात आहे. या तक्रारीच्या आधारावर विश्वास यांच्याकडून उत्तर मागवल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी सांगितले.

विश्वास यांच्या पत्नीवर अफवा पसरवल्याचा आरोप
महिला आयोगाकडे तक्रार करणाऱ्या महिलेने कुमार विश्वास यांच्या पत्नीवर यासंबंधी अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. डिसेंबर महिन्यात विश्वास यांच्या तथाकथिक अनैतिक संबंधांच्या आरोपाच्या बातम्या सोशल मिडियावर आल्या होत्या. त्यावेळी विश्वास यांच्या पत्नीला या संबंधांबाबत माहिती होती आणि त्यांनी विश्वास यांना रंगे हात पकडलेही होते, अशी चर्चा होती.

विश्वास यांचे स्पष्टीकरण, 'मोदिया' ला पंजाबमध्ये उत्तर मिळेल
या प्रकरणी नोटीस मिळाल्यानंतर सोमवारी विश्वास यांची प्रतिक्रिया आली. एका ट्वीटमध्ये विश्वास म्हणाले की, 'Lekin "Modia" ko Satya se Kya matlab?Punjab mein Zawaab milega' आपचे कार्यकर्ते अंकित लाल यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना विश्वास यांनी हे ट्वीट केले. अंकित यांचे ट्वीट - @ankitlal The notice to @DrKumarVishwas does not mention illicit relationship. The lady says that some ppl are defaming her nd she wants action.
पुढील स्लाईडवर वाचा, या संपूर्ण प्रकरणावर आपने काय भूमिका मांडली आहे....काय म्हणाले कुमार विश्वास....