आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WCD Ministry Detects Fake NGOs Applying For Funds

योजनांसाठी मंत्रालयाचा पैसा घेणाऱ्या ९० % एनजीओ बोगस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिला व बाल कल्याण (डब्ल्यूसीडी) मंत्रालयाने स्वयंसेवेवी संस्थांच्या बनवेगिरीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेलया माहितीनुसार प्रशिक्षण व नियोजनाअंतर्गत विविध योजनांसाठी आर्थिक अनुदान घेण्यासाठी मंत्रालयाकडे जवळपास १४०० स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) त्यांच्याकडे अर्ज केले होते.
प्रस्तावांची खातरजमा करत असताना त्यापैकी ९० टक्के संस्था बनावट असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मंत्रालयाचया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शरी व ग्रामीण भागात उपेक्षित घटकांच्या तसेच महिलांच्या कौशल्य विकास व प्रशिक्षणासाठी मंत्रालय अशा संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी वितरित करते. त्यासाठी एनजीओंनी अर्ज केले होते. पण हा निधी गरजूंपर्यंत पोहोचतच नाही.