आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे अण्वस्त्र अड्डे नष्ट करणे, चीनशी लढण्यास आम्ही सक्षम; वायुदलप्रमुखांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने आदेश दिल्यास हवाई दल सर्जिकल स्ट्राइकसह दोन आघाड्यांवर एकाचवेळी मोहिमा फत्ते करू शकते. आम्ही पाकिस्तानचे अण्वस्त्र अड्डे शोधून नष्ट करण्यास तर सक्षम आहोतच, शिवाय चीनच्या आव्हानांचाही सामना करू शकतो, असा इशारा भारताचे वायुदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी गुरुवारी दिला. 

वायुसेना दिनाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल धनोआ बोलत होते. ते म्हणाले, भारतीय वायुदल युद्धाच्या दोन शक्यतांशी लढण्यास पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालीन स्थिती कमीत कमी वेळेत पूर्ण क्षमतेने युद्ध करण्यास आम्ही सक्षम आहोत. पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी ४२ फायटर स्क्वॉड्रनची गरज आहे असे नाही. इतकी ताकत नसतानाही आम्ही या दोन्ही शक्यतांशी लढा देऊ शकतो. २०३२ पर्यंत वायुदल ४२ फायटर स्क्वॉड्रनची स्वीकृत क्षमता प्राप्त करून घेईल. चुम्बी व्हॅलीमध्ये चीनची फौज तैनात असून हा डोकलामचाच भाग आहे. उन्हाळी शिबिरानंतर चिनी लष्कर तेथून परत जाईल, असेही त्यांनी सांगितले.  

वायुसेनाप्रमुखांना विमान अपघात तसेच त्यामुळे होणारी जीवित तसेच वित्तहानीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या विमानांची खरेदी तसेच प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिला वैमानिकांच्या नियुक्तीबाबत ते म्हणाले, भरती प्रक्रिया सुरू असून काही महिलांना तैनात करण्यात आले आहे. लष्करी शिबिरांची सुरक्षाही वाढवली जात आहे.  

आपल्यावरच बळाचा उपयोग नाही करणार  
नक्षलवाद्यांशी संबंधित मुद्द्यावर वायुसेनाप्रमुख म्हणाले की, आम्ही आपल्या बळाचा वापर आपल्याच लोकांवर करणार नाही. दरम्यान, नक्षलवाद्यांविरोधातील “ऑपरेशन त्रिवेणी’मध्ये वायुदल वाहतुकीसाठी मदत करत आहे.
बातम्या आणखी आहेत...