आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • We Have No Reason To Believe That The Indian Economy Is Back To 1991: PM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पीएम चोर है\' वाक्‍यावरुन पंतप्रधान भडकले, जेटलींसोबत उडाली चकमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशातील प्रत्‍येक महत्त्वाच्‍या प्रश्‍नावर कायम मौन बाळगल्‍याचा आरोप सहन करणारे पंतप्रधान मनमोहनसिंग आज राज्‍यसभेत अचानक भडकले. विरोधकांच्‍या टीकेला त्‍यांनी प्रत्‍युत्तर देऊन सर्वांनाच चकीत केले. मात्र, त्‍यानंतर त्‍यांचे विरोधी पक्षनेते अरुण जेटलींसोबत खटके उडाले. दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पंतप्रधानांनी विरोधी पक्षाला सुनावले तर भारतीय जनत पक्षाच्‍या सदस्‍यांनीही त्‍यांच्‍यावर पलटवार केले.

लोकसभेत निवेदन दिल्‍यानंतर पंतप्रधान राज्‍यसभेत पोहोचले. विरोधकांनी त्‍यांना ति‍थे कोंडीत पकडण्‍याचा प्रयत्‍न केला. निवेदनानंतर विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यासाठी उभे राहिल्‍यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम विरोधकांवर टीकास्‍त्र सोडले. ते म्‍हणाले, पंतप्रधान बोलत असताना विरोधी पक्षाचे सदस्‍य सभापतींसमोर येऊन पंतप्रधान चोर आहे, अशी नारेबाजी जगातील कोणत्‍याही देशात होत नसेल.

पंतप्रधानांच्‍या या वक्तव्‍यानंतर दुस-याच क्षणी अरुण जेटली उत्तरले, जगातील कोणत्‍याही देशात विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्‍यासाठी मतांची सौदेबाजीही होत नाही. कोणत्‍याही लोकशाहीमध्‍ये पंतप्रधानांना विश्‍वास मत विकत घेताना ऐकले आहे का?

यावरुन संसदेत गदारोळ झाला. पंतप्रधान एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्‍हणाले, विरोधी पक्षनेते भ्रष्‍टाचाराबद्दल बोलतात. भारतात ही समस्‍या प्रदिर्घ कालावधीपासून आहे. पंतप्रधान एवढे बोलत नाही, तोच एक सदस्‍य म्‍हणाले, कोळसा घोटाळ्याशी संबंधित फाईल्‍स कशा गहाळ होतात? त्‍यावर पंतप्रधान उत्तरले, मी फाईलींचा संरक्षक नाही. त्‍यावर, 'तुम्‍ही नाही तर कोण आहे?' असा प्रतिप्रश्‍न करण्‍यात आला.

अर्थव्‍यवस्‍थेबाबत काय म्‍हणाले पंतप्रधान? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...