आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Intend To Move Amendments To The Draft Resolution On Sri Lanka In The UNHRC, Says Finance Minister P Chidamabaram.

द्रमुकच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सोपविला राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- श्रीलंकेतील तामिळ नागरिकांवर झालेल्‍या अत्‍याचाराप्रकरणी डीएमकेने काल युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर आज सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. याप्रकरणी संयुक्त राष्‍ट्रसंघातील प्रस्‍तावासंबंधी ठराव संमत करण्‍याचे संकेत सरकारने दिले आहेत. डीएमकेने पाठिंबा काढल्‍यानंतरही सरकार बहुमतात असल्‍याचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी स्‍पष्‍ट केले. तर भाजपने सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव आणणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. सरकार आपोआपच पडेल, असे भाजपने म्‍हटले आहे.

सरकारने श्रीलंकेतील अत्‍याचारांबाबत भूमिका स्‍पष्‍ट केल्‍यानंतरही संसदेत प्रचंड गदारोळ झाला. त्‍यामुळे दोन्‍ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्‍थगित करण्‍यात आले. द्रमुकचे मंत्री पलानिमनिक्‍कम, एस. गांधीसेल्‍व्हन, एस. जगतरक्षकमयांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सोपविला. तर एम. के. अळगिरी आणि डी. नेपोलियन हे स्‍वतंत्रपणे राजीनामा देणार असल्‍याचे द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांनी सांगितले.

संसदेचे कामकाज सुरु होण्‍यापूर्वी सरकारच्‍या 3 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्‍पष्‍ट केली. कमलनाथ, मनीष तिवारी आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. चिदंबरम म्‍हणाले, श्रीलंकेबाबत संयुक्त राष्‍ट्रसंघाने एक कडक ठराव संमत केला पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. तामिळी नागरिकांच्‍या भावना संसदेमध्‍ये योग्‍य ठरावाद्वारेच मांडता येइतील. यासंदर्भात संसदेमध्‍येही ठराव मांडण्‍याचा सरकार विचार करत आहे. सरकारची भूमिका माहिती असूनही डीएमकेने पाठिंबा का काढून घेतला हे कळत नाही. तरीही सरकार स्थिर आहे, असे चिदंबरम म्‍हणाले. तर कमलनाथ यांनीही सरकारकडे बहुमत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

डीएमकेने काल या मुद्यावरुन काल पाठिंबा काढून घेतला होता. तर त्‍यासंदर्भात राष्‍ट्रपतींकडेही पत्र सोपविले.