आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमान वाटेल अशी गावे उभारू, पंतप्रधानांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्रामीण भारताच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी खासदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ केला. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाचा अभिमान वाटेल असे वातावरण आम्ही तयार करू, अशी ग्वाही मोदी यांनी या वेळी दिली.

मोदी म्हणाले, वाराणशीतील लोकांशी चर्चा करून तीन गावे निवडणार आहे. अनेक खासदारांनी निवडलेल्या गावांची नावेसुद्धा सांगितली. यातील बहुतांश खासदार काँग्रेसचे होते. लोक एवढे स्वागत करत आहेत, म्हणजे योजनेत नक्कीच दम आहे, असे मोदी म्हणाले.
डिमांड ड्रिव्हन हेच विकास मॉडेल : मोदी म्हणाले, आतापर्यंत विकास मॉडेल डिमांड नव्हे तर सप्लाय ड्रिव्हन आहे. दिल्ली, लखनऊ, गांधीनगरात योजना तयार होते आणि ती सगळीकडे लागू करण्याचा प्रयत्न होतो. या योजनेतून आम्ही मॉडेल सप्लाय ड्रायव्हनकडून डिमांड ड्रायव्हन करू इच्छितो. जनतेच्या भागीदारीतूनच हे मॉडेल पुढे जाईल.

गरजेनुसार योजनेत बदल
मोदी म्हणाले की, योजना वरून खालपर्यंत यावी की खालून वरपर्यंत जावी यावर चर्चा सुरू आहे. पण काम करणा-याला कोठून तरी सुरुवात करावी लागेल. रातोरात बदल घडेल असा माझा दावा नाही. ही योजना परिपूर्ण नाही. त्यात बदल आणि सुधारणा होत जाईल.

२५०० गावांच्या विकासाचे उद्दिष्ट
प्रत्येक खासदाराला २०१६पर्यंत मतदारसंघातील १ व २०१९ पर्यंत ३ गावे विकसित करायची आहेत. खासदारांनी स्वत:चे किंवा सासुरवाडीचे गाव निवडू नये. २०१९पर्यंत २५०० गावे विकसित होतील. राज्यांनीही योजना अंमलात आणली तर ६ ते ७ हजार गावे विकसित होतील. एका तालुक्यात १ गावही विकसित झाल्यास परिणामी इतर गावेही विकसित होतील.