आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazonने केली तिरंग्याची पायपुसणी, स्वराज यांनी खडसावले- \'बंद करा, अन्यथा अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करु \'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॅनडा येथील अॅमेझॉन डॉट कॉम या ऑनलाइन वेबसाइटवर भारतीय तिरंग्याच्या रंगातील पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याविरोधात काही भारतीयांनी सोशल मीडियावर आवाज उठविला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे त्याची तक्रार करण्यात आली. स्वराज यांनी अॅमेझॉनच्या या कृत्यावर तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर वेबसाइटवरुन पायपुसणीची विक्री बंद करण्यात आली आहे. स्वराज यांनी कॅनडातील भारतीय दुतावासाला अॅमेझॉनवर कारवाईच्या सुचना केल्या आहे. 
 
काय म्हणाल्या सुषमा स्वराज 
- परराष्ट्रमंत्री स्वराज ट्विटरच्या माध्यमातून अॅमेझॉनला खडसावले आहे. भारतीय ध्वजाची बदानामी करणाऱ्या प्रॉडक्टची विक्री बंद केली नाही तर अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना भारताचा व्हिसा देणार नसल्याचे त्यांनी धमकावले. स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले, 'ज्यांना आधी व्हिसा देण्यात आला असेल त्यांचाही व्हिसा रद्द केला जाईल.' 
- स्वराज यांनी कॅनाडीतील भारतीय दुतावासाला सांगितले, 'हे सहन केले जाणार नाही. कृपया याची माहिती अॅमेझॉनच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना द्यावी.'
- 'भारतीय तिरंग्याचा अवमान होत आहे. अॅमेझॉनने या संबंधी तत्काळ माफी मागावी आणि ते प्रॉडक्ट काढून घ्यावे.'
- सुषमा स्वराज यांनी ट्विट करेपर्यंत अॅमेझॉनने या प्रॉडक्टवर काहीही म्हटलेले नाही. 
 
सोशल मीडिया यूजर्सने सुषमा स्वराजांकडे केली तक्रार 
- काही भारतीय सोशल मीडिया यूजर्सने सुषमा स्वराज आणि कॅनडातील भारतीय दुतावास, परराष्ट्र मंत्रालयाला ट्विट करुन प्रॉडक्ट बद्दलची माहिती दिली होती. 
- लोकांनी या प्रॉडक्टच्या जाहिरातीवर लिहिले होते, 'अॅमेझॉनने तिरंग्याचा अपमान केला आहे. हे आमच्या सन्मानाच्याविरोधात आहे. या प्रॉडक्टला त्वरीत हटवले गेले पाहिजे.'
- 'पायपुसणीच्या माध्यमातून तिरंगा आणि देशाचा अपमान होत आहे. त्याची विक्री तत्काळ थांबवावी.' 

दुसऱ्या देशांचा झेंडा असलेल्या प्रॉडक्ट्सची विक्री 
- अॅमेझॉन कॅनडावर इतरही देशांच्या ध्वजांच्या पायपुसण्या विक्रीसाठी आहेत. त्यात  अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. 
- अमेरिका आणि कॅनडाचे नागरिक त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाचे टॉवेल, बेडशीट आणि इतर अनेक प्रॉडक्ट्स वापरतात. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वराज यांचे ट्विट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आलीली पायपुसणी 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...