आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weather Conditions All Over The World And India Affected From Drought

देशातील 25% जनता दुष्काळाने हैराण, हैदराबादमध्ये लागली \'पाणीबाणी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील 33 कोटी (जवळपास 25%) जनता दुष्काळाने होरपळत आहे. - Divya Marathi
देशातील 33 कोटी (जवळपास 25%) जनता दुष्काळाने होरपळत आहे.
नवी दिल्ली - देशात उष्णता आणि दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशातील 33 कोटी लोक दुष्काळाचा सामना करत आहेत. 14 राज्यांचे तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त आहे. उत्तर भारतात एप्रिलमध्ये मे-जून सारखा सूर्य तापत आहे. हैदराबाद शहरातील चार रिझर्व्हवॉयर 30 वर्षांत पहिल्यांदा अटले आहेत. त्यामुळे तिथे 'पाणीबाणी' लागू केली आहे. तर, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक 11 वर्षांची मुलगी भर उन्हात पाणी भरताना मृत्यूमुखी पडली. 43 डिग्री तापमानात योगिता हँडपंपावरुन पाणी भरत असताना गतप्राण झाली.

जगभरातील हवामानात बदल
- पूर, वादळ, बर्फवृष्टी, वाढते तापमाना यामुळे जग हैरान आहे. अमेरिका मुसळधार पाऊस, पूर, हिमवादळाने त्रस्त आहे.
- तर, ब्रिटनमध्ये या मोसमात झालेल्या बर्फवृष्टीने सर्वांनाच चकित केले.
- आशिया खंडात अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये पर्जन्यवृष्टीमुळे या महिन्यात 150 लोकांनी प्राण गमावले.

भारतात दुष्काळाने 33 कोटी लोक हैराण
- केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले, की देशात दुष्काळामुळे 10 राज्यांतील 256 जिल्ह्यांतील 33 कोटी लोक त्रस्त आहेत.
- एकट्या उत्तर प्रदेशात 10 कोटी लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
- दुष्काळग्रस्त 10 राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी मनरेगा अंतर्गत 38,500 कोटी रुपयांपैकी जवळपास 19,555 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
या 14 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त
- महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडुच्या अनेक भागांमध्ये 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे.
- हवामान खाते यासाठी अल निनो, ग्लोबर वार्मिंग जबाबदार असल्याचे सांगते. दोन वर्षांच पर्जन्यमान कमी झाल्यामुळेही तापमान वाढले आहे.
- हवामान खात्यानुसार यंदाच्या एप्रिल महिन्यांतील उष्णता गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांचे म्हणणे आहे, की ही तर नुसती सुरुवात आहे अजून तापमान वाढणार आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम इतर राज्यांवरही होणार आहे.

अशी बिघडत गेली परिस्थिती
- गेल्या 25 वर्षांत मान्सून चांगला राहिलेला नाही. देशातील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे.
- केंद्र सरकारमधील अधिकारी शशी शेखर यांच्या म्हणण्यानुसार पाण्याचे दुर्भिक्ष हे काही आज निर्माण झालेले संकट नाही, तर अनेक वर्षांपासून ते चालत आले आहे. पाणी या पारंपरिक स्त्रोताला (तलाव किंवा बंधारे) साठवून ठेवण्यात आले नाही.
- शेतीसोबत औद्योगिक मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भुजलपातळी संपत आली आहे.
- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लातूरमध्ये रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे, की बियर आणि साखर कारखान्यांना पाणी द्यावे की नाही.

मार्चच्या तापमानाने मोडला 100 वर्षांचा रेकॉर्ड
- पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा मोठा पुरावा यंदा मार्च महिन्यात मिळाला.
- जपानच्या हवामान खात्याने यासंबंधीचा एक रिपोर्ट तयार केला आहे.
- त्यानुसार, मार्च 2016 मध्ये गेल्या 100 वर्षातील मार्चमधील सरासरी पेक्षा 1.07 अंश तापमान वाढले आहे.

नासाचा अहवाल, फेब्रुवारी अधिक उष्ण राहिला
- नासाच्या रिपोर्टनुसार, यंदा मार्च महिन्यात गेल्या 66 वर्षांच्या तुलनेत 1.28 अंशांने अधिक तापमान होते.
- फेब्रुवारीतील तापमान मार्चपेक्षाही जास्त होते.
- नासाने दोन्ही महिन्यातील अंतर 1.34 अंश असल्याचे सांगितले.

काय आहे इशारा ?
- हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे, की क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी कडक नियमावली तयार केली गेली नाही तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
- 2016 सर्वाधिक तप्त वर्ष ठरू शकते. 2015 मध्ये सरासरी तापमाना 0.90 अंश जास्त होते.
पुढील स्लाइडमध्ये, पाहा देशासह जगभरातील बदललेले हवामान