आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Fog In Delhi Read More At Divyamarathi.com

कडाक्याच्या थंडीने दिल्लीत गोठली सोमवारची सकाळ, पारा 4.8 तर दृष्ययमानता 0

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्लीतील सोमवारची सकाळ कडाक्याच्या थंडीने झाली आहे. सोमवार सकाळी (ता.22) 6.30 वाजता दिल्लीतील तापमान 4.8 डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. तर रविवारचे तापमान 6.8 डिग्री एवढे होते. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्‍ली-एनसीआरमध्ये धूके पसरले आहे.
धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून विमान आणि रेल्वेसेवेच्या वेळापत्रकांमध्येही त्यामुळे मोठा बदल करावा लागत आहे. सकाळी दिल्‍ली विमानतळावरील दृष्यमानता शून्‍य टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे जवळपास 150 विमानांच्या उड्डाणांवर प्रभाव पडला आहे. तर धुक्यामुळे उत्‍तर भारतातील 131 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दिल्लीतून सुटणा-या आणि दिल्लीत येणा-या रेल्वे 1 ते 18 तास उशिराने धावत आहेत.
थंडी आणखी वाढणार , हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज
हिमाचलमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण असणार आहे. उंच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येथील प्रशासनाने रोहतांग, लाहौल स्पीती येथील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. 23 डिसेंबरपर्यंत हवामान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे.

उत्तर भारतात 11 ठार
कडाकाच्या थंडीमुळे आत्तापर्यंत उत्‍तर भारतामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणातील नारनौल या भागातील किमान तापमान 1.6 डिग्री, तर हिसारमधील तापमान 1.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
पुढे पाहा - उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीचे PHOTO...