आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा केला गौप्यस्फोटाचा अन् आणले कॉमिक्स, दिवसभर चर्चा-अफवांना ऊत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टिंग ऑपरेशनद्वारे शोधपत्रकारिता करणारे वेबपोर्टल कोब्रापोस्ट एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे वृत्त सोमवारी दुपारी धडकले. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. सुरक्षा व गुप्तचर संस्था अंदाज बांधत बसल्या. मंगळवारी कोब्रापोस्टने पत्रपरिषद घेतलीही, मात्र समोर आले ते कॉमिक्स!
कोब्रापोस्टचे एडिटर-इन-चीफ अनिरुद्ध बहल यांनी "अॅडव्हेन्चर्स ऑफ रिया, द कोब्रापोस्ट अफेयर' हे कॉमिक्स तयार केले आहे. त्याच्या लाँचिंगच्या एका दिवसाआधी प्रसिद्धीसाठी कोब्रापोस्टच्या युक्तीची कल्पना नसल्याने सुरक्षासंस्था चक्रावल्या. गौप्यस्फोटाची माहिती मिळवण्याच्या कामी गृहमंत्रालय, रॉ आणि गुप्तचर संस्थेचे काही अधिकारी जुंपण्यात आले. बाब गृहसचिवांपर्यंत पोहोचली. कोब्रापोस्टच्या संपादकांनाही फोनाफानी झाली, मात्र त्यांनी खुलासा केला नाहीच.शेवटी गौप्यस्फोटाऐवजी कॉमिक्स समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

युक्तीची कल्पनाही नाही
अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करणाऱ्या कोब्रापोस्टची सुरुवात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदारांच्या स्टिंगने झाली होती. त्यानंतर ११ खासदार बडतर्फ झाले होते. यामुळे कोब्रापोस्टच्या दाव्याकडे कुणीही डोळेझाक केली नाही.

अशी वातावरणनिर्मिती
निमंत्रणात लिहिले होते, ऑपरेशन- "आर : एका वर्षाच्या मेहनतीनंतर मोठा गौप्यस्फोट. देशाच्या सुरक्षेतील त्रुटी व सुरक्षा संस्थांची संवादाची कमतरताही पुढे येईल.'

यूपीए शासनकाळात भारतात अमेरिकी डेल्टा फोर्स तैनात होती.
पंतप्रधान कार्यालयाला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
भारतात आयएसआय तसेच तालिबानासाठी काम करत होती.
अतिरेकी राजकारण्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नात आहेत.
दिल्लीत अतिरेक्यांच्या बैठका आिण ऑपरेशनचीही चर्चा.