आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ वाचवण्यासाठी दोन चिमुरड्यांची वेबसाइट; प्रत्येक क्लिकवर 'गुगल' देणार सात रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाघ वाचवण्याचा संदेश देण्यासाठी दोन शाळकरी मुलांनी वेबसाइट लॉँच केली आहे. आदर्श व शुभम या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेसाठी उन्हाळ्यात वेबसाइट लॉँच करण्याचे ठरवले. मित्र, शेजारी आणि हितचिंतकांच्या अर्थसाहाय्यातून वेबसाइट आकाराला आली.

thundertigers.weebly.com या साइटवर स्वत:विषयी माहिती देताना त्यांनी नमूद केले की, ‘वाघ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपण माणसांनी त्यांना वाचवले पाहिजे. लांब शेपटीच्या या प्राण्याचे शरीर बळकट आहे. खालच्या व वरच्या जबड्यातील दातांमुळे तो इतरांच्या तुलनेत सशक्त आहे.’

वाघाबाबतच्या जनजागृतीची सुरुवात त्यांनी घरापासून केली. डॉटकॉम डोमेन नोंदणीकृत करण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन पैसे जमा केले. यातून त्यांना 1700 रुपये मिळाले. आम्हाला शेजारी, मित्र व हितचिंतकांनी त्यासाठी आर्थिक मदत केल्याचे शुभम म्हणाला. टीव्हीवर जाहिरात पाहिल्यानंतर दोघांनी वाघ वाचवण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरवले. वेबसाइट अस्तित्वात आल्यानंतर गुगलने साइटच्या प्रत्येक क्लिकसाठी सात रुपये मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हा निधी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांना दिला जाईल.