आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Website Name Booking In Hindi Proposed From August 15 For Rs 350 Osbveijr

मराठी, हिंदीतही असेल बेवसाईटचे डोमेन नेम, 15 ऑगस्टपासून मिळू शकते सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : प्रतिकात्‍मक

नवी दिल्‍ली : 15 ऑगस्टपासून एखाद्या वेबसाईटचे डोमेन नेम किंवा नाव देवनागरी लिपीत नोंदवता येणार आहे. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाचे सीईओ गोविंद यांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना गोविंद म्हणाले की, आतापर्यंत डोमेन नेम केवळ इंग्रजी भाषेत ठेवणे अनिवार्य होते. पण आता तसे राहणार नाही. त्यामुळे हिंदी किंवा मराठी भाषेतही डोमेन नेम ठेवता येणार आहे. याभाषांमधील नावाचे बुकींग करता येणार आहे. या देवनागरी लिपीतील वेबसाइटच्या नावांचे बुकींग 15 ऑग्सटपासून प्रस्तावित आहेत. पण अद्याप त्याला वरिष्ठ अधिका-यांची मंजुरी मिळालेली नाही.

काय असेल फीस?
हे डोमेन नेम बूक करण्यासाठी 350 रुपये शुल्क लागेल. स्क्रिप्टमध्ये डोमेन नेमचे टॉप लेव्हल एक्सटेंशन ‘डॉट भारत’ असेल. त्याबरोबरच 'डॉट कॉम' किंवा 'डॉट नेट' ची सुविधाही उपलब्ध असेल. सब-डोमेनचे रजिस्‍ट्रेशन 250 रुपयांत होऊ शकेल. गोविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार डोमेन बुकींगमध्ये असणा-या कंपन्यांना वेबसाईटचे नाव देवनागरी लिपीत बूक करण्याची सुविधा दिली जाणार आहे. गोविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचे दोन महिने ही सुविधा ज्या कंपन्या आणि सरकारी संघटनांना त्यांचे ब्रँड किंवा ट्रेडमार्कच्या नावाचे डोमेन बूक करायचे असेल त्यांना दिली जाईल.