आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींच्‍या मुलीचे रिसेप्शन: मोदी-शाह पोहोचले, धमेंद्रसह दिसल्‍या जया बच्चन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुलगी सोनाली यांच्‍या लग्‍नाचे बुधवार रिसेप्‍शन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्‍थिती लाभली. सर्वात आधी पोहोचणा-या पाहुण्‍यांमध्‍ये भाजपाध्‍यक्ष अमित शाह यांची उपस्‍थिती होती. राज्यसभा सदस्य जया बच्चन, यूपीचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांच्‍या पत्‍नी डिम्पल या सोहळ्याला उपस्‍थित होत्‍या. सुप्रीम कोर्टाचे वकील आणि राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी सायकलने या रिसेप्‍शनला पोहोचले होते.
सोनाली यांचे लग्‍न 7 डिसेंबरला जयेश बख्शी यांच्‍यासोबत झाले. बुधवार दुपारी जेटली यांच्‍या कृष्ण मेनन मार्गा्वरील शासकीय निवासस्‍थानाच्‍या आवारात रिसेप्‍शन सोहळा ठेवण्‍यात आला.
पूढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या रिसेप्‍शनला भेट देणा-या दिग्‍गजांचे फोटो..