आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांपासून भारताचे सरन्यायाधीश ठाकूर यांचे डोळे पाणावले, कंठ दाटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात आपण भावुक होऊ असे काही क्षण असतात. कधी दु:खात, कधी विरहात, तर कधी कोणत्या यशात भावना व्यक्त होते. गेल्या काही दिवसांत काही लोकांच्या आयुष्यात असे काही क्षण पाहावयास मिळाले ज्यावर अनेकांच्या नजरा राहिल्या.

बराक ओबामा

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष
व्हाइट हाऊसमध्ये काही दिवसांपूर्वी आयोजित रात्रीभोजदरम्यान ओबामा यांनी आपल्या दोन्ही मुली किती लवकर मोठ्या झाल्याचे सांगू लागले. ओबामा यांनी ही मेजवानी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूड आणि त्यांची पत्नी सोफी यांच्या स्वागतानिमित्त दिली होती.
काय झाले - ओबामा म्हणाले, माझी जेव्हा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मालिया १० आणि साशा सात वर्षांची होती. आता मालिया कॉलेजला जाऊ लागली आहे. हे बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला.
बेन स्टोक्स
इंग्लंडचा क्रिकेटपटू

बेन इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू मानला जातो. तो मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून सर्वांत वेगात शतक आणि द्विशतक ठोकले आहे. याशिवाय तो कसोटी सामन्यात सर्वांत वेगात २५० धावा करणारा फलंदाज आहे.
काय झाले - कोलकातामध्ये टी- २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा फलंदाज कार्लोस ब्रेथवेटने त्याची धुलाई केली होती. त्याच्या एका षटकात सलग चार षटकार खेचत वेस्ट इंडीजला विजय मिळवून दिला. गोलंदाजीच्या चिंधड्या उडाल्याचे पाहून त्याला रडू आले. यानंतर संघातील सहकाऱ्यांनी त्याला धीर दिला.
पुढील स्लाइडमध्ये, न्या. टी. एस. ठाकूर, देशाचे सरन्यायाधीश