आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Did David Headly Tell About Ishrat Jaha,asks Digvijay Singh

इशरतबाबत हेडलीने काय सांगितले होते?- दिग्विजय सिंह यांचा गृहमंत्र्यांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इशरत जहॉं चकमक बनावट होती, असे सीबीआयने स्‍पष्‍ट केल्‍यानंतर आता कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नवा वाद निर्माण करुन सरकारलाच घरचा अहेर दिला आहे. सीबीआयने इशरतप्रकरणी दाखल केलेल्‍या आरोपपत्रात लष्‍कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्‍हीड हेडलीने नोंदविलेल्‍या जबाबाचा उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही. हेडीलने अमेरिकेच्‍या तपास यंत्रणांना दिलेल्‍या जबाबात इशरत जहॉंचे नाव घेतले होते. यासंदर्भात दिग्विजय सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्‍याकडून माहिती जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. डेव्‍हीड हेडलीने इशरातबाबत काय सांगितले होते, असा दिग्विजय सिंह यांचा थेट प्रश्‍न आहे.

मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेच्‍या तपास यंत्रणांनी डेव्‍हीड हेडलीला अटक केली होती. त्‍याने आतापर्यंत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. हेडलीने इशरत जहॉंचे नाव चौकशीदरम्‍यान घेतले होते. सुत्रांच्‍या माहितीनुसार, एनआयएच्या पहिल्‍या अहवालात हा उल्‍लेख होता. परंतु, त्‍यानंतरच्‍या अहवालातून इशरतचा उल्लेख काढण्‍यात आला होता. याबाबत आयबीने आक्षेप घेतला होता. आयबीला मिळालेल्या प्राथमिक माहितीत हेडलीने इशरतचा उल्लेख केल्याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले होते. त्‍यामुळेच डेव्हीड हेडलीने इशरत जहाँच्या दहशतवादांशी सबंधाबद्दल काय म्हटले होतं, हे गृहमंत्रालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. याचसंदर्भात आपण गृह मंत्रालयात आलो होतो, असे दिग्विजय सिंह यांनी स्‍पष्‍ट केले.