आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेरबर्गने FB पोस्टमध्ये केला मोदींचा उल्लेख, सांगितले ते कसा करतात सोशल मीडियाचा उपयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेसबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. त्यांनी लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा त्यातही फेसबुकसोबत कायम जोडलेले असतात. ते त्यांचे मंत्री आणि सहकाऱ्यांना सभा आणि आपल्या कामाची माहिती फेसबुकवर शेअर करण्याचा सल्ला देतात. यामुळे थेट लोकांशी जोडले जात असल्याचे ही मोदी सांगतात.' झुकेरबर्गने Building Global Community शिर्षकाखाली एक पत्र लिहिले आहे. 
 
- मार्क यांनी 6500 शब्दांचे हे सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मोदींचा उल्लेख केला आहे. 
- पोस्टमध्ये मार्क म्हणाले, सध्या लोक निवडणुका संपल्यानंतरही आपल्या नेत्यांसोबत त्यांच्या दैनंदिन गरजा आणि समस्यांच्या माध्यमातून जोडलेले असतात. या समस्या मांडण्यासाठी त्यांना सोशल मीडिया हा सर्वात चांगला प्लॅटफॉर्म आहे. जनतेला नेत्यांसोबत जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया मदत करते. 
 
ग्लोबल पॉलिटिक्समध्ये मोदींचा उल्लेख 
- मार्क यांनी शेअर केलेल्या पत्रामध्ये त्यांनी ग्लोबल पॉलिटिक्सबद्दल लिहिले आहे. त्यात त्यांनी मोदींचा उल्लेख केला आहे. 
- त्यासोबतच मार्क यांनी एक उदाहरण देताना केनियामधील एक पूर्ण गाव, ज्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी देखील आहे ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोडलेले असल्याचे सांगितले. 
- मार्क म्हणाले, 'नुकतेच आम्ही पाहिले आहे की भारतापासून इंडोनेशियापर्यंत आणि यूरोपपासून यूनायटेड स्टेट्सपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये जेवढे उमेदवार विजयी झाले त्यातील सर्वाधिक फेसबुकशी जोडलेले होते.'
 
TV ची जागा सोशल मीडियाने घेतली
- मार्क झुकेरबर्ग म्हणाले, 'निवडणुकीच्या काळाशिवाय मतदारांशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. यामुळे  जनतेच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांना तुम्हाला भीडता येते.' 
- मार्क म्हणाले, आम्ही जनता आणि त्यांच्या प्रतिनिधीमध्ये थेट संवाद घडवून आणू शकतो आणि त्यांना त्यांची जबाबदारी समजावून सांगू शकतो.
- मार्क म्हणाले, पूर्वीच्याकाळी माहिती मिळविण्याचे एकमेव साधन टीव्ही होते. 21 व्या शतकात सोशल मीडियाने टीव्हीची जागा घेतली आहे. 
   
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...