आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात टॉक शो, प्रश्न एकच - मुलांसोबत असे क्रौर्य कशासाठी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 16 वर्षे वयाच्या मुलांना शरीरसंबंधांच्या अधिकारांवर राजकीय पक्ष सोमवारी सरकारपुढे भूमिका मांडतील. संसदीय कार्यमंत्र्यांच्या दालनात सकाळी 9.30 वाजता सर्वपक्षीय बैठक सुरू होईल.

भाजपाध्यक्ष राजनाथसिंग, सपाचे रामगोपाल यादव, जदयूचे शरद यादव यांनी वय घटवणे कदापि मान्य केले जाणार नाही, असे रविवारीच स्पष्ट केले आहे. वय घटवण्याच्या मुद्दय़ावर जवळपास सर्वच राज्यांतून विरोध होत आहे. सध्या आहे त्या स्वरूपात विधेयक पारित केले जावे, असे सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही वाटत नाही. काँग्रेसच्या अनेक खासदारांनी सरकारने याबाबत फेरविचार करावा, असे म्हटले आहे. विरोध वाढल्यास हा प्रस्ताव सिलेक्ट कमिटीकडे पाठवला जाऊ शकतो, असे एका केंद्रीय मंत्र्याने म्हटले आहे.

दिव्य मराठी नेटवर्कची 13 राज्यांत वाचकांशी चर्चा, जनतेची खासदारांना पत्रे, समाजातील प्रत्येक घटकाचा विरोध, विरोधी पक्षही विरोधात आणि सरकार व काँग्रेसमध्ये मतभेद...

आई-वडील- टॉक शोमध्ये म्हणाले, आम्ही 16 व्या वर्षी मुलांचे लग्न केले तर गुन्हा, परंतु सरकार संबंधांना मोकळीक देत असेल तर रास्त. मुली सुखरूप घरी परततील याची सरकार जबाबदारी घेणार काय? टॉक शो म.प्र., दिल्ली, झारखंड व चंदिगडमध्ये घेतले.

कुलगुरू/प्राध्यापक- दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विजेंद्र सिंह, सेंट स्टीफन कॉलेजच्या प्राध्यापक नंदिता नारायण, अरबिंदो कॉलेजचे प्राध्यापक र्शीप्रकाश सिंह म्हणाले, सेक्स फ्री समाज बनवण्याचा सरकारचा हट्ट दिसतो. हे वय करिअर करण्याचे असते. पण कायदेशीर मुभा मिळाल्यास मुले चुकीच्या मार्गाने विचार करू लागतील. यास जबाबदार कोण?

विद्यार्थी/विद्यार्थिनी- दिल्ली विद्यापीठातील नेहा सिंग म्हणाली, सरकार निष्पाप मुलांना चुकीच्या मार्गाला लावत आहे. रांची वुमन्स कॉलेज, झारखंड, राजस्थान, म.प्र.तील विद्यापीठाचे विद्यार्थी विरोध करताना म्हणाले, 16 वर्षे वय केल्याने अत्याचार थांबले नाहीत, तर सरकार हे संमतीवय 14 करणार काय?

एनजीओ- बाल संरक्षण आयोग, बचपन बचाओ, सेव्ह चिल्ड्रन, चाइल्ड लाइन म्हणतात की, कुमारी मातांची संख्या, अबॉर्शन सरकारला वाढवायचे असेल. एफआयआर घटतील, अत्याचार नाही.

डॉक्टर्स - स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमन सिन्हा म्हणाल्या, लहान वयात संबंधांमुळे मुली गंभीर आजाराला बळी पडतील. सायकियाट्रिस्ट डॉ. अशोककुमार म्हणाले, मुलांच्या शारीरिक विकासाऐवजी सरकारने त्यांच्या मानसिक विकासाचा विचार करायला हवा.

इतर- संत किरीटभाई म्हणाले, 18 वर्षे पूर्ण करण्याआधी शरीरसंबंध धर्माविरुद्ध आहेत. झारखंड महिला आयोगाच्या अध्यक्ष अनुराधा चौधरी म्हणाल्या, समाजात अराजक माजेल. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी म्ह्णाले, आम्ही या कायद्याला विरोध करू.

हा तुमच्या मुलांशी निगडित प्रश्न आहे. असा कायदा होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव वाढवावा लागेल. तुम्ही एवढेच करा, आमच्याकडे 8082005060 या क्रमांकावर एसएमएस पाठवत राहा. त्यात टाइप करा, 'संमतीने संबंधांचे वय 16 करण्यास माझा विरोध आहे.' सोबत आपले व आपल्या शहराचे नाव आवर्जून लिहा.