आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही तर वापरत नाहीयेत ना फेक WhatsApp? 10 लाख लोकांनी केले डाऊनलोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 लाख लोकांनी जगभरात बनावट व्हॉट्सअॅप डाउनलोड केले. - Divya Marathi
10 लाख लोकांनी जगभरात बनावट व्हॉट्सअॅप डाउनलोड केले.
नवी दिल्ली - तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये फेक WhatsApp तर वापरत नाहीयेत ना? वास्तविक, 10 लाख लोक गुगल प्ले स्टोरमधून फेक व्हॉट्सअॅप डाउनलोड करून युज करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, गुगल प्ले स्टोअरवर Update WhatsApp नावाने एक अॅप आहे. त्याला खूप दिवसांपासून लोक डाउनलोड करत आहेत. ओरिजिनल WhatsApp प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपर नावाने आहे. WhatsApp चे बनावट अॅप गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपर नावानेच उपलब्ध होते. यामुळे लोकांना खरे-खोटे समजले नाही आणि तब्बल 10 लाख लोकांनी ते डाउनलोड केले. या  फेक अॅपची खासियत म्हणजे इन्स्टॉल झाल्यावर हे अॅप मिनिमम परमिशन मागते. हे फेक अॅप WhatsApp+Inc%C2%A0.” या कोडिंगसह उपलब्ध होते. तथापि, आता या फेक अॅपला प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे.
 
रेडिट युजरने शोधले FAKE अॅप
- एका रेडिट युजरनुसार, या फेक WhatsAppने अशा लोकांचे नुकसान केले ज्यांनी ते आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले.
- साधारणपणे, बनावट अॅपची ओळख पटवण्यासाठी लोक डेव्हलपरचे नाव वाचतात, ज्यामुळे अॅपच्या निर्मात्याची माहिती मिळते. आणि डेव्हलपर खरा आहे वा नाही हेही कळते. परंतु येथे नाव एकच असल्याने गोंधळ उडाला आणि लोकांनी डाउनलोड केले.
- गुगलने म्हटले की, हे प्रकरण गांभीर्याने पाहिले जात आहे.
 
पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हॉट्सअॅप क्रॅशबाबत...
बातम्या आणखी आहेत...