आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: कारमध्ये चुकूनही असे करु नका, होईल अपघात, जिवावर येईल संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बराच काळ कार बंद असेल आणि त्यानंतर आपण कारमध्ये प्रवेश केला तर कुबट असा वास येतो. असा वास घालविण्यासाठी आपण कार फ्रेशनर्सचा वापर करतो. पण आपण विसरुन जातो की कार फ्रेशनर्समध्ये काही ज्वलनशिल पदार्थ असतात. त्याची माहिती वॉटलवर दिली असते. तरीही आपण त्याकडे सोईस्कर डोळेझाक करतो. अशा वेळी असा भयंकर अपघात आपल्यासोबत घडू शकतो.
या कारमधील मित्रांना कुबट असा वास येत होता. त्यांनी कारच्या काचा उघडल्या नाहीत. उलट कार फ्रेशनर्सचा स्प्रे केला. त्यानंतर भरीस भर म्हणजे सिगारेट शिलगाविण्यासाठी लाईटर पेटवले. मागच्या सिटवर बसलेल्या मुलाने जसे लाईटवर पेटवले तसा कारमध्ये आगीचा लोळ उठला. यात सर्वच मित्रांना जळाल्याच्या दुखापती झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने यात कारने पेट घेतला नाही. नाहीतर सर्वच मित्रांचा हातोहात जीव गेला असता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, लाईटवर लावल्यावर कारच्या आत कसा उठला आगीचा लोळ....