नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश दोन्ही गट सध्या निवडणूक चिन्ह सायकलसाठी भांडत आहेत. सायकलवर दावा करण्यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोग आज निर्णय देण्याची शक्यता आहे.
यासंबंधीत आणखी एक रंजक माहिती म्हणजे, आणीबाणीनंतर काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) ची स्थापना केली. त्यावेळी इंदिरा गांधींबरोबर निवडणूक आयोगाकडे गेलेल्या हंसराज भारद्वाज यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की, त्यावेळी सायकल आणि हत्ती या चिन्हांचे पर्यायही होते, पण इंदिराजींनी तेव्हा 'पंजा'ची निवड केली.
काँग्रेसला कसा मिळाला 'पंजा'?
मीडिया रिपोर्ट्सनुसार 'पंजा' हा शंकराचार्य स्वामी चन्द्रशेखर सरस्वती यांचा आशिर्वाद आहे. आणीबाणीनंतर मोठा पराभव झाल्याने इंदिरा कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी चन्द्रशेखर सरस्वती यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उजवा हात वर करत इंदिराजींना आशिर्वाद दिला आणि हाताचा पंजा हे निवडणूक चिन्हं घेण्यास सांगितले. त्यानंतर या नव्या चिन्हाने काँग्रेसला चार राज्यांत सत्ता मिळवून दिली होती.
पुढील स्लाइड्वर वाचा, काँग्रेसमध्ये केव्हा केव्हा पडली फूट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)