आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रांमधून दिसते वास्‍तव, अधिकारीच पुढा-यांचे पाय धरतात तेव्‍हा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशमध्‍ये आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्‍या निलंबनावरुन सुरु झालेला वाद थांब‍ण्‍याची चिन्‍हे नाहीत. राज्‍य सरकार भूमिकेवर ठाम आहे तर, वक्फ बोर्डाने नागपाल यांना क्‍लीन चिट दिली आहे. संबंधित मशिदीची भिंत पाण्‍यामागे नागपाल यांची कोणतीही भूमिका नसल्‍याचे बोर्डाने स्‍पष्‍ट केले आहे. अनेक माफियांनी वक्‍फ बोर्डाच्‍या जमिनीवर कब्‍जा केला आहे. त्‍यांच्‍याविरुद्ध नागपाल यांची मोहिम सुरु होती, असे बोर्डानेच म्‍हटले आहे. दुसरीकडै समाजवादी पार्टीचे नेते नरेंद्र भाटी यांच्‍यासंदर्भात काही पुरावे समोर आले आहेत. कादलपूर भागात ही मशिद बांधण्‍यासाठी नरेंद्र भाटी यांनी 51 हजार रुपये दिल्‍याबाबत एक पत्र प्राप्‍त झाले असून त्‍यावर पोलिस उपमहानिरिक्षकांची स्‍वाक्षरी आहे. मशिदीचे भूमिपुजन भाटी यांनीच केले होते.

नागपाल यांचा दोष नसतानाही उत्तर प्रदेश सरकार भूमिकेवर ठाम आहे. केंद्राकडून नागपाल यांच्‍यासंदर्भात अहवाल मागविण्‍यात आल्‍यानंतर समाजवादी पार्टीच्‍या नेत्‍यांचा तिळपापड झाला आहे.

एकीकडे राजकीय नेते आणि अधिका-यांमध्‍ये संघर्ष निर्माण झालेला दिसत आहे. तर, दुसरीकडे अधिका-यांनीच पुढा-यांचे पाय धरल्‍याचेही प्रकार अनेकदा घडले आहेत. पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोणत्‍या अधिका-याने कोणत्‍या पुढा-याचे पाय धरले...