आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडून प्रमोशन मिळवत बनले कॅबिनेट मंत्री, पण राष्ट्रपतींनी बरोबर पकडली चूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चांगला कारभार करणाऱ्या मंत्र्यांना प्रमोशन दिले आहे. मोदींकडून प्रमोशन मिळवणाऱ्यांमध्ये समावेश असलेले एक नाव म्हणजे धर्मेंद्र प्रधान. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे मंत्री म्हणून ओळख असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना मोदींकडून प्रमोशन मिळाले असले तरी राष्ट्रपतींनी शपथविधी दरम्यान त्यांची एक चूक पकडली आणि लगेचच ती दुरुस्तही करायला लावली. 
 
काय झाले नेमके..
- धर्मेंद्र प्रधान यांना मोदींनी नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले आहे 
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली
- शपथ घेत असताना धर्मेंद्र प्रधान अडखळले आणि त्यांनी चुकीचा शब्द उच्चारला
- धर्मेंद्र प्रधान यांची चूक लगेचच कोविंद यांच्या लक्षात आली. कोविंद यांनी प्रधान यांना थांबवले आणि पुन्हा ते वाक्य म्हणायला लावले. 
- प्रधान यांनी शपथ घेताना 'संसुचित' या हिंदी शब्दाऐवजी 'समुचित' असे वाचले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, जेव्हा मुलाची चूक पकडल्याने लालूंना आला होता राग...
 
बातम्या आणखी आहेत...