आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा स्टेजवरच जोरदार आपटली सपना चौधरी, गैरवर्तनाचीही झाली होती शिकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी बिग बॉस-11 मध्ये पोहोचली आहे. रविवारपासून शो सुरु झाला आहे. - Divya Marathi
सपना चौधरी बिग बॉस-11 मध्ये पोहोचली आहे. रविवारपासून शो सुरु झाला आहे.
नवी दिल्ली - वादग्रस्त डान्सर सपना चौधरी टीव्ही शो बिग बॉसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रविवारी बिग बॉस शोला सुरुवात झाली असून सपना चौधरी बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. हरियाणवी गायिका सपना चौधरीचे बिग बॉसचा होस्ट सुपरस्टार सलमान खानने स्वागत केले. सपना चौधरी दिल्ली, एनसीआर, हरियाणासह राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहे, आता ती मुंबईत पोहोचली आहे. सपना चौधरी प्रसिद्ध डान्सर असली तरी तिचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक संकटांचा सामना करत ती येथे पोहोचली आहे. एकदा तर ती डान्स करताना स्टेजवर पडली होती, तर एकदा स्टेजवरच तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले होते. 

पडल्यानंतरही पुन्हा सुरु केला डान्स 
- काही वर्षांपूर्वी सपनाचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात ती स्टेजवर परफॉर्मन्स देत असतानाच कोसळली होती. 
- सपनाचे सुदैव की यात तिला कोणतीही दुखापत झाली नाही. डान्स करताना पडल्यानंतर काही क्षणात पुन्हा उभी राहून तिने कार्यक्रम सुरु ठेवला. 
- हा व्हिडिओ कुठला आहे याचा काही तपास लागलेला नाही मात्र सपनाचा हा डान्स व्हिडिओ 23 जून 2017 ला रिलीज झाला होता. त्याला आतापर्यंत 28 लाखवेळा पाहिले गेले आहे. 
 
या कारणामुळे चर्चेत आली सपना
- सपना चौधरी हिने गुडगावमधील चक्करपूर भागात 17 फेब्रुवारी 2016 ला एक रागिनी गाऊन वादाला तोंड फोडले होते. रागिनी गाऊन जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचा सपनावर आरोप आहे. 
- सतपाल तंवर यांनी 14 जुलै 2016 ला सपना चौधरीविरोधात एससी/एसटी अॅक्टनुसार तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सपनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. 
- सपनाने 04 सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. 
- हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सपना जेव्हा स्टेजवर कोसळली... स्टेजवरच गैरवर्तन
बातम्या आणखी आहेत...