आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rape case : सर्वोच्‍च न्‍यायालयाने ठोठावली मृत व्‍यक्‍तीला सात वर्षांची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - कुण्‍याही व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला तर त्‍याच्‍या पाप पुण्‍याचा निवाडा स्‍वर्गातच होतो, असे सांगितले जाते. पण, आपल्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने बलात्‍काराचा आरोप असलेल्‍या एका मृत व्‍यक्‍तीला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. एवढेच नाही तर तब्‍बल सात महिन्‍यानंतर ही चूक न्‍यायालयाच्‍या लक्षात आली. त्‍यानंतर सोमवार, 16 नाव्‍हेंबरला न्‍यालयालयाने आपला निर्णय मागे घेतला. ज्‍या व्‍यक्‍तीला न्‍यायालयाने दोषी ठरवले त्‍याचा मृत्‍यू तीन वर्षांपूर्वीच झालेला आहे.
कशी आली न्‍यायालयाच्‍या लक्षात चूक ?
बलात्‍कार प्रकरणातील एका संशयित आरोपीला सर्वोच्‍च न्‍यायालयाने 10 एप्रिल 2015 ला दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा ठोठावली. न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्‍यासाठी त्‍याच्‍या गावात पोहोचले. पण, कौटुंबीक वादातून आरोपीच्‍या भावाने वर्ष 2012 मध्‍ये त्‍याचा खून केल्‍याची माहिती पोलिसांना ग्रामस्‍थांनी दिली. त्‍यानंतर पोलिसांनी आरोपीच्‍या खुन प्रकरणाचे आरोपपत्र आणि त्‍याचे मृत्‍यूपत्र न्‍यालयालयात सादर केले. पोलिसांचा हा अवहाल मिळाल्‍यानंतर न्‍यायामूर्ती पी. सी. घोष आणि न्‍यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्‍या खंडपीठाने आरोपीची फाइल बंद करण्‍याचा आदेश देत त्‍याला ठोठावलेली शिक्षा मागे घेतली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आरोपी होता मूक-बधिर, खालच्‍या न्‍यायालयातून सुटला होता निर्दोष