आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Will Porn Sites Block ?, Supreme Court Ask To Telecomunication Department

पॉर्न साइट्स ब्लॉक कशा करणार? ,सर्वोच्च न्यायालयाची ‘दूरसंचार विभागा’कडे विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने चाइल्ड पोर्न वेबसाइट्स कशा ब्लॉक करणार, अशी विचारणा दूरसंचार विभागा (डॉट)कडे केली आहे. उत्तरासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
न्या. बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) इंदिरा जयसिंह यांच्या उत्तरानंतर आदेश जारी केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा संबंध केवळ नभोवाणी व दूरचित्रवाणीवर प्रसारित सामग्रीशी आहे. वेबसाइट्सवर नियंत्रण आणण्याशी नाही, असे एएसजीने सांगितले. त्यावर न्यायालयाने पोर्न साइट्सवर निर्बंध लादण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याबद्दल सरकारला फटकारले.
इंदूरचे अँड. कमलेश वासवानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत पोर्न साइट्सवर बंदी लादण्याची मागणी केली होती. महिलांविरुद्ध होणार्‍या गुन्ह्यांमागे हे एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.