आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आहेत लालकृष्ण अडवाणी, लोहपुरुषाला \'गंज\' चढलाय का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालकृष्ण अडवाणी सध्या कुठे आहेत, असा प्रश्न जर कोणी विचारला तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीच स्पष्ट सांगता येणार नाही आणि प्रवक्त्यांचीही बोबडी वळेल. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाल्यानंतर पक्षाला कट्टर हिंदूत्ववादी रुप बहाल करण्यात अडवाणींच्या योगदानावर चर्चा करण्याचीही गरज नाही एवढे त्यांचे काम ठळक होते. मात्र भाजपला या 'लोहपुरुषा'चे दिवसेंदिवस विस्मरण होत चालले आहे की जाणून बुजून त्यांना 'गंज' चढेल असेच त्यांच्यासोबत वागले जात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
देशभरात नुकतीच दीनदयाल उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी झाली. भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणी यानिमीत्ताने कार्यक्रम साजरे केले पण अडवाणी या कार्यक्रमांमध्ये कुठेच चमकले नाही. वास्तविक 25 वर्षांपूर्वी याच अडवाणींनी दीनदयाल यांच्या जयंती दिनी (25 सप्टेंबर 1990 ) 'रथ यात्रा' सुरु केली होती. आज अडवाणींनाच कोणी विचारत नाही तिथे त्यांच्या रथ यात्रेचा रौप्य महोत्सव कोण साजरा करणार ?
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का बाजूला पडले अडवाणी