आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whether Effect: Fog Create Problems As Air, Rail And Bus Transport Hampered

धुक्यामुळे 132 रेल्वे रद्द, यमूना एक्स्प्रेस-वेवर 15 गाड्या एकमेकांना भिडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजधानी दिल्लीत दाट धुक्याची चादर पसरली आहे. - Divya Marathi
राजधानी दिल्लीत दाट धुक्याची चादर पसरली आहे.
नवी दिल्ली - राजधानीत आज मोसमातील सर्वात दाट धुके आहे. आयजीआयवर व्हिजिबिलिटी केवळ 50 ते 75 मीटर आहे. यामुळे शताब्दी एक्स्प्रेससह 132 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ला येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक फ्लाइट्सला उशिर झाला आहे. दाट धुक्यामुळे यमूना एक्स्प्रेस-वेवर 15 गाड्या एकमेकांना भिडल्या आहेत.

दिल्ली आणि गुडगावमध्ये पाहाटेपासून धुके
- दिल्लीहून चालणाऱ्या 132 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- गुरुवारी दिल्ली विमानतळावरील व्हिजिबिलिटी 500 ते 900 मीटर होती. सायंकाळी 4.30 7.30 वाजता दरम्यान 700 मीटरवर आली.
- धुक्यासोबत हलक्या सरी देखिल आहेत. त्याशिवाय हवेचा वेग मंदावला आहे.

आणखी कुठे दाटले धुके
- राजधानी दिल्लीशिवाय पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेश.
- दिल्लीत पारा आज 13 डिग्रीवर पोहोचला आहे.
- आज दिवसभर ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यता आहे.

शताब्दीसह काही गाड्या आज रद्द
- भोपाळहून दिल्लीकडे येणाऱ्या-जाणऱ्या रेल्वे गुरुवारपासून रद्द आहेत.
- शताब्दी, भोपाळ एक्स्प्रेस, मालवा, श्रीधाम, याशिवाय 20 गाड्या धुक्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
- नवी दिल्ली - हबीबगंज शताब्दी एक्स्प्रेस अप आणि डाऊन मंगळवार आणि शुक्रवारी रद्द करण्यात आली.
- भोपाळ एक्स्प्रेस 8 जानेवारी ते 1 मार्च पर्यंत दर सोमवार आणि गुरुवारी हबीबगंज येथून रद्द असेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्लीत धुक्यामुळे वाहतूक मंदावली