आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारविरोधी पाच विधेयकांवर अध्यादेश, व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या संसद अधिवेशनात केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधातील सहापैकी फक्त एकच विधेयक मंजूर करून घेऊ शकले. शुक्रवारी राज्यसभेने व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक मंजूर केले. लोकसभेत ते आधीच पारित झाले होते. भ्रष्टाचाराविरोधातील सहा विधेयके राहुल गांधींच्या अजेंड्यात होती. मात्र आता केंद्र 5 विधेयकांसाठी वटहुकूम आणेल. त्यापैकी व्हिसलब्लोअर कायद्यात रुपांतरित होईल. मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींकडून अधिकारांचा गैरवापर व त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या नागरिकांना संरक्षण देण्याची तरतूद या कायद्यात आहे.
दरम्यान, दोन्ही सभागृहांत खासदारांच्या भावपूर्ण भाषणांनी संसदेच्या शेवटच्या अधिवेशनाचा समारोप झाला.
लोकसभेत सर्वात कमी कामकाज :
आकडेवारीनुसार 15 व्या लोकसभेत सर्वात कमी कामकाज झाले. पाच वर्षांत फक्त 165 विधेयके मंजूर झाली. दोन्ही सभागृहांत 126 विधेयके अडकून पडलेली आहेत. त्यापैकी 72 लोकसभेत आहे. 31 मे रोजी सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ संपल्यावर आपोआप ही विधेयके रद्द होतील.

(संग्रहित छायाचित्र - नवी दिल्ली येथे व्हिसलब्लोअर विधेयक मंजूर करावे ही मागणी करणारे आंदोलक)