आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 हजार जण चौकशीच्या फेऱ्यात; प्राप्तिकर विभागाच्या स्वच्छ धन मोहिमेच्या दुसऱ्या प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीनंतर काळ्या पैशाचा छडा लावण्यासाठी प्राप्तिकर विभागाने हाती घेतलेल्या स्वच्छ धन मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला असून त्याअंतर्गत ६० हजार लोकांची चौकशी केली जाईल.  

रोख विक्रीला रोख जमा रकमेचा स्रोत दाखवत आहेत, अशा व्यापाऱ्यांचाही दुसऱ्या टप्प्यात सखोल चौकशी होणाऱ्या लोकांत समावेश आहे. या श्रेणीत पेट्रोल पंप व रुग्णालयासारख्या सेवाही येतात, असे सीबीडीटीने  म्हटले आहे. या मोहिमेत जमा रकमेची मर्यादा नाही. सर्व संशयास्पद व्यवहार या चौकशीत समाविष्ट केले आहेत.

९,३३३४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड 
८ नोव्हेेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या वर्षीच्या  २८ फेब्रुवारीपर्यंत ९,३३४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा छडा लावल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...