आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्यता, निष्ठेमुळेच संधी आणि बक्षीस, टीम मोदीतील नवे चेहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळातील २१ नवीन चेह-यांमधील पाच नेत्यांचा समावेश केवळ त्यांची पात्रता लक्षात घेऊन झाला आहे. पैकी सात जण गरजवंत आणि नऊ जणांना निष्ठेचे फळ मिळाले आहे.
योग्यता : गोव्याचे मुख्यमंत्री आणि आयआयटीयन मनोहर पर्रीकर, जी-२० संमेलनासाठी पंतप्रधानांचे सल्लागार सुरेश प्रभू, राजीव प्रताप रुडी, आयआयडी व हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी जयंत सिन्हा व ऑलिंपियन कर्नल राजवर्धन सिंह राठोड यांना योग्यतेमुळेच मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
गरज : बिहारमध्ये यादव चेह-याची गरज असल्याने रामकृपाल यादव यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. गिरिराज सिंह यांनादेखील भूमिपुत्र नेता म्हणून स्थान देण्यात आले आहे. हरियाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून चौधरी वीरेंद्र सिंह यांना मंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे समाधान करण्यासाठी राजस्थानात सांवरलाल जाट यांना मंत्रिपद मिळाले आहे. भाजपचा जुना मुस्लिम चेहरा असल्यामुळे मुख्तार अब्बास नक्वी यांना संधी देण्यात आली. पश्चिम बंगालमधील पक्षाला बळकट करण्यासाठी बाबूल सुप्रियो यांना, तर वायएस चौधरी टीडीपीच्या कोट्यातून मंत्री बनले.
निष्ठा : उर्वरित नेत्यांना पक्षाशी बांधिलकी दाखवल्याबद्दल मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यात जगतप्रकाश नड्डा प्रमुख आहेत. ते भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. हंसराज अहिर यांनी कोळसा घोटाळा करण्यात महत्त्वाची भूमिका वठवली होती. डॉ. महेश शर्मा, साध्वी निरंजन ज्योती संघाच्या कोट्यातून आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणाला मिळाले कोणते खाते आणि त्यामागील कारण