आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tiger Attack Who Is Maqsood News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर वाघाच्या हल्ल्यातून मकसूद वाचला असता? जाणून घ्या, कोण आहे मकसूद?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - दिल्ली येथील पांढर्‍या वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मकसूदला वाचवता येऊ शकले असते. मात्र लोकांनी त्रास दिल्यामुळे वाघाने मकसूदवर हल्ला केला असे प्राणी संग्रहालय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
वाघाच्या या हल्ल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला आहे. मात्र या तपासात अजून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विजय नाव असलेल्या या वाघाची देखभाल करणारे श्यामलाल म्हणाले की, तो तरुण खाली पडताच वाघ त्याच्या जवळ आला. मात्र तरूणाच्या जवळ जाऊनही वाघाने त्याच्यावर हल्ला नाही केला. वाघ त्याचा वास घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यादरम्यान मकसूदही आपला जीव वाचवत वाघाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी मी त्या पिंजर्‍याच्या बाडजवळ पोहोचलो. मी बाडेच्या आडमधून वाघास "विजय इधर आ" असा आवाज दिला. माझा आवाज आवाज ऐकून वाघ माझ्याकडे पाहात होता. मात्र माझ्या आवाजाला प्रतिसाद देण्याआगोदरच कोणी तरी त्याला दगड मारला. पहिलेच दिल्लीतील गरमीने हैराण झालेल्या वाघाला यामुळे अजून राग आला आणि त्याने मकसूदवर हल्ला केला.

पुढील स्लाईडवर वाचा, कोण आहे मकसूद आणि शेवटच्या स्लाइडमध्ये श्यामलालचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय असा व्हिडीओ...