आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएम मोदींसोबत कोण आहे ही महिला, जाणून घ्या काय आहे या फोटोचे सत्य?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींसोबत अनुवादक गुरदीप कौर चावला. - Divya Marathi
पंतप्रधान मोदींसोबत अनुवादक गुरदीप कौर चावला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दल युजर्स वेगवेगळे कयास लावत आहेत. ही महिला कोण आहे आणि व्हीव्हीआयपी लोकांसह यांचा फोटो का मीडियामध्ये येतो? याबद्दल एक रोचक माहिती समोर आली आहे.

-वास्तविक, पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पेप्सिको चेअरमन इंद्रा नुयी यांच्यासोबत दिसत असलेल्या महिलेचे नाव गुरदीप कौर चावला आहे.
- मोदींसाठी गुरदीप अनुवादक (इंटरप्रिटेटर) चे काम करतात.
- तथापि, आपल्या विदेश दौऱ्यादरम्यान पीएम मोदी जेव्हा हिंदीत भाषण देतात तेव्हा गुरदीप त्याचा इंग्रजी अनुवाद करतात.
- गुरदीप यांना अनुवाद करण्याचा 26 वर्षांहून जास्त अनुभव आहे. भारताच्या संसद भवनापासून त्यांनी सुरुवात केली होती.

 

संसदेत पहिली नोकरी
- वास्तविक, 1990 मध्ये गुरदीप कौर यांना संसद भवनात अनुवादकाच्या पदासाठी निवड झाली होती.
- यानंतर 1996 मध्ये त्या ही नोकरी सोडून आपल्या पतीसह अमेरिकेत शिफ्ट झाल्या.

ओबामा यांच्यासह भारतात आल्या
- यूएसमध्ये राहत असलेल्या गुरमित कौर चावला सध्या अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या मेंबर आहेत. सोबतच त्या इंटरप्रिटेशन, ट्रान्सलेशनसहित संघीय प्रकरणांत सुपीरियर कोर्टाच्या भाषेच्या यशस्वी अनुवादक आहेत.
- 2010 मध्ये गुरमित कौर तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासह इंटरप्रिटेटर बनून आल्या होत्या.
- अनेक हायप्रोफाइल मीटिंग्जमध्ये सामील होणाऱ्या गुरदीप यानंतर 2014 मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या कार्यक्रमात होत्या.
- तेथून त्या मोदींसह डीसी वाशिंग्टनला गेल्या, येथे त्यांनी मोदी आणि ओबामांदरम्यान इंटरप्रिटेटरचे काम केले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...