आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Be Better Prime Minister: Rahul Or Modi?

मोदी X गांधी, कोण होईल देशाचा शासक, वाचून तुम्हीच ठरवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्याआधीच देशातील प्रमुख राजकीय पक्षांसोबत लहान-मोठ्या पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. राजकीय ताकद दाखविण्यासाठी आतापासून दंड थोपटणे सुरु केले आहे. निवडणूक जिंकण्याची रणनीती आखली जात असून तिच्यावर अंमलबजावणी केली जाताना दिसत आहे. उल्लेखनिय म्हणजे सत्ताधारी कॉंग्रेस आणि सत्ता मिळवण्यासाठी गेली 10 पेक्षा जास्त वर्षे जीवाचे रान करणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरूद्ध आतापासूनच रणांगणात उतरले आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली आहे. परंतु अद्याप कॉंग्रेसने आपल्या उमदेवाराचे नाव जाहीर केलेले नाही. परंतु कॉंग्रेसमधील बहुतेक नेत्यांना 'युवराज राहुल गांधी हेच पंतप्रधान!' असे स्वप्न पडू लागले आहे.

कॉंग्रेसने पंतप्रधानपदासाठी 'राहुल गांधी' यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यास देशातील
सर्वसामान्य जनतेसमोर एक प्रश्न उपस्थित राहू शकतो, आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कोण चांगला पंतप्रधान होऊ शकतो? देशाचे प्रशासन उत्कृष्ठ पद्धतीने कोण हाताळू शकेल?
पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'कोणाला किती अनुभव?'