आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Bear The Maintenance Cost To Keep The Tricolor Flying At Delhi's Highest Flagpole?

सर्वात मोठय़ा ध्वजाचा वादही मोठाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत सर्वात मोठा ध्वज उभारण्यात येऊन जेमतेम तीन महिने उलटताच वादाला तोंड फुटले आहे. तिरंगा ध्वजाच्या देखभालीसाठी लागणारे लाखो रुपये कोण खर्च करणार यावरून मतभेद तीव्र झाले आहेत.

उद्योगपती नवीन जिंदाल यांचे फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया (एफएफआय) आणि नवी दिल्ली मनपा (एनडीएमसी) यांचा संयुक्त प्रकल्प म्हणून सेंट्रल पार्कमध्ये हा सर्वात उंच ध्वज उभारण्यात आला. मार्च महिन्यात हा ध्वज उभारण्यात आला. ध्वजारोहण करेपर्यंत आमची जबाबदारी होती. आता ध्वजाच्या देखरेखीची जबाबदारी एनडीएमसीची आहे, असे एफएफआयने स्पष्ट केले आहे. देशभरात एफएफआयच्या वतीने 56 ध्वज उभारण्यात आलेले आहेत. ध्वज उभारण्यात आलेल्या जागेच्या मालकाचीच देखभालीची जबाबदारी राहील, असे एफएफआयकडून सांगण्यात आले आहे. एफएफआयने एनडीएमसीला एक पत्र लिहिले आहे. त्यात उर्वरित खर्च मनपाने करावा, असे म्हटले आहे.
जबाबदारीची ढकलाढकली
एफएफआय आणि दिल्ली मनपाने ध्वजाच्या देखभालीची जबाबदारी आपली नसल्याचा दावा केला आहे. एफएफआयने ध्वज उभारण्यात आल्यानंतर त्याच्या देखभालीचा विषय आपला राहत नसल्याचे म्हटले आहे. मनपाने मात्र ध्वजाच्या देखभालीचा खर्च उचलण्यात येईल, असे एफएफआयकडून अगोदरच कबूल करण्यात आले होते, असा दावा मनपाने केला आहे. ध्वजाच्या देखभालीचा खर्च आम्ही अनेक वेळा केला आहे, असा दावा एफएफआयकडून करण्यात आला आहे.

जयपूरकडून शिका
ध्वजाच्या देखभालीवरून एखाद्या सरकारी संस्थेशी वाद होण्याची एफएफआयची ही पहिलीच वेळ आहे. जयपूरमध्येदेखील अशा प्रकारचा ध्वज उभारण्यात आला आहे. तेथील जयपूर विकास प्राधिकरणाने देखभालीचा खर्च उचलला आहे, असे एफएफआयचे म्हणणे आहे.

किती येतोय खर्च ?
सर्वात मोठय़ा ध्वजाचा खर्च महिन्याला सरासरी 52 हजार रुपये येतो. एकाच वेळी दुरुस्तीसाठी किमान 8, 000-10,000 रुपये मोजावे लागतात. ध्वजाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचाही खर्च आहे. नवीन ध्वजासाठी 64 हजार रुपये खर्च येतो.