आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who You Calling 'Uncle': What Caused Air India Cockpit Fight

‘अंकल’ म्हटल्याने पायलट भडकला; विमानातच भांडण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहवैमानिकाने ‘अंकल’ असे संबोधल्याने एअर इंडियाच्या मुख्य वैमानिकाच्या संतापाचा भडका उडाला. त्यामुळे दोघांमध्ये कॉकपिटमध्येच जोरदार भांडण झाले. मुख्य वैमानिकाच्या तक्रारीनंतर हे प्रकरण दिल्लीत उघडकीस आले. ते एआय ६११ हे विमान घेऊन रविवारी रात्री जयपूरहून दिल्लीत आले होते. जयपूर विमानतळावरून उड्डाणापूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते.

तक्रार आल्यानंतर एअर इंडियाने दोघांनाही उड्डाण ड्यूटीवरून काढले. एअर इंडिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. डीजीसीएनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.

भांडणास कारण की...
वरिष्ठ वैमानिक उड्डाणापूर्वी आकडेवारी नोंदवत होता. त्या वेळी कनिष्ठ वैमानिकाने त्यांना ‘अंकल’ अशी हाक मारली. त्यामुळे तो नाराज झाला आणि दोघांत कडाक्याचे भांडण झाले. आपण मारहाण केली नाही, असे कनिष्ठ वैमानिकाने सांगितले.