आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'संपूर्ण हिमालय प्रदेश ढगफुटीच्या सावटाखाली,16 हिमनद्या-सरोवरे धोकादायक स्थितीत '

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संपूर्ण हिमालय प्रदेश ढगफुटीच्या सावटाखाली असून हिमाचलमधील 16 हिमनद्या-सरोवरे धोकादायक स्थितीत असल्याचे विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान विभागाचे मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी गुरुवारी सांगितले.

संपूर्ण हिमालय प्रदेशास ढगफुटीचा धोका आहे. हिमाचल प्रदेशव्यतिरिक्त उत्तराखंड, काश्मीर, लेह आणि हिमालयातील अन्य भागांत ढगफुटीचे संकट आहे, असे जयपाल रेड्डी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.

एकिकृत पर्वत विकास संस्थेच्या अहवालात हिमाचल प्रदेशातील 156 हिमनद्या सरोवरांपैकी 16 धोकादायक स्थितीत आहेत. हिमालय हवामान कार्यक्रमांतर्गत हवामान, पावसाशी संबंधित रडार यंत्रणा तसेच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केले जाणार आहे. नव्या यंत्रणेमुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यास मदत मिळेल.