आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठोक महागाई शून्याखाली, डिसेंबरमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ठोक महागाई दर डिसेंबरमध्ये सलग १४ महिन्यांत शून्याच्या खाली असला तरी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये ठोक महागाई दर शून्य ते ०.७३ टक्क्यांच्या खाली राहिला, हाच दर नोव्हेंबरमध्ये उणे १.९९ टक्क्यांवर होता. गेल्या महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये महागाई वाढली असून हा दर ५.२० टक्क्यांवरून वाढून ८.१७ टक्क्यांवर आला आहे. यामुळे महागाईत वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१५ पासून ठोक महागाई दरात सलग वाढ होत आहे. कॉमर्स मंत्रालयाच्या वतीने जाहीर होणाऱ्या आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली आहे.

उत्पादनातही वाढ
डिसेंबर २०१५ मध्ये उत्पादित वस्तूंची ठोक महागाई वाढली आहे. वास्तविक सध्या हा आकडा शून्याच्या खाली १.३६ टक्क्यांवर आहे. नोव्हेंबरमध्ये हा उणे १.४२ टक्क्यांवर होता. ठोक महागाई निर्देशांकात उत्पादित वस्तूंची भागीदारी ६४.९७ टक्के आहे, तर अखाद्य पदार्थांमध्ये ठोक महागाई गेल्या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये ही ७.७० टक्के झाली आहे, तर नोव्हेंबरमध्ये ती ६.३३ टक्के होती.

इंधन महागले
डिसेंबरमध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील ठोक महागाई दर नोव्हेंबरच्या तुलनेत वाढले आहेत. डिसेंबरमध्ये या क्षेत्रातील महागाई उणे ९.१५ टक्के राहिली. नोव्हेंबरमध्ये ही उणे ११.०९ टक्के होती. पेट्रोलमधील महागाई गेल्या महिन्यात वाढून उणे ७.९० टक्के झाली, जी नोव्हेंबरमध्ये उणे ९.३० टक्के होती. ठोक महागाईत यांची भागीदारी १४.९१ टक्के आहे.

तांदूळ, भाज्या, दूध, अंडी महाग
- जाहीर आकडेवारीनुसार तांदूळ, भाज्या, बटाटा, फळे, दूध, अंडे, मांस, मासे यांच्या ठोक बाजारातील किमती वाढल्या आहेत.
- तांदूळ ठोक उणे १.२५ टक्क्यांनी महागला, जो नोव्हेंबरमध्ये उणे ३.२२ टक्के होता.
- फळांचा महागाई दर ०.७६ टक्के राहिला, हाच नोव्हेंबरमध्ये उणे २.३५ टक्के होता.
- दुधाचे ठोक भाव १.७६ टक्क्यांनी वाढले, जे नोव्हेंबरमध्ये १.५८ टक्क्यांवर होते.
- अंडे, मांस, मासे यांच्या किमती ५.०३ टक्क्यांनी वाढल्या.

डाळी, गहू, कांदा स्वस्त
- डिसेंबर महिन्यात डाळ, कांदा, गव्हाच्या ठोक किमती कमी झाल्या आहेत.
- डाळीच्या ठोक किमती नोव्हेंबरमध्ये ५८.१७ टक्क्यांनी महागल्या होल्या, त्या डिसेंबरमध्ये ५५.६४ टक्क्यांवर आल्या.
- कांद्याचे तेजीचे दर ५२.६९ टक्क्यांनी घटून २५.९८ टक्क्यांवर आले आहेत.