आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Are Netaji Disappearing From Syllabus: CIC To NCERT

नेताजींचीची माहिती का काढली, सीआयसीची एनसीईआरटीला विचारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एनसीईआरटीलाआपल्या इितहासाच्या पुस्तकांत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांचा विसर पडला आहे. काही पुस्तकांत त्यांची त्रोटक माहिती आहे. तर काही पुस्तकांत साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आयोगाकडे(सीआयसी) प्रकरण आल्यानंतर त्यांनी एनसीईआरटीला धारेवर धरत पुस्तकांमधून नेताजींची माहिती का काढून टाकण्यात आली, अशी विचारणा केली.
जयपूरचे रहिवासी सूर्यप्रतापसिंह राजावत यांनी सीआयसीकडे याचा पाठपुरावा केला होता. ते आरटीआय आणि लोकतक्रारींशी संबंधित माहिती मागत होते. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाल्याने त्यांनी माहिती आयोगाकडे धाव घेतली. यावर माहिती आयुक्त श्रीधर अाचार्युलू म्हणाले, अर्जदाराच्या आरटीआय अर्जात टीका, सल्ला आणि शिफारशी जास्त दिसतात. ही शिफारसही होऊ शकते. संबंधितांनी हा अर्ज तक्रार म्हणून घ्यावा, असे आयोगाला वाटते. तक्रारदाराला आपल्या अर्जावर केलेल्या कारवाईची माहिती जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. पब्लिक अॅथॉरिटी या नात्याने माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम चारअंतर्गत एनसीईआरटीने स्वत: असे का केले ते सांगावे. एनसीईआरटीचे प्रतिनिधित्व करणारे प्रोफेसर नीरज रश्मी म्हणाले, अभ्यासक्रम समिती स्वतंत्र काम करते. ते त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत.
स्‍वामी विवेकानंदांशी संबंधी माहितीही काढली
> आठवीच्या पुस्तकात २००७ च्या आधी नेताजींशी संबंधित ५०० शब्द होते. बारावीच्या पुस्तकात १२५० शब्द होते. आता बारावीत केवळ ८७ शब्द आहेत. आठवीत तर साधा उल्लेखही नाही.
> बारावीच्या इतिहास पुस्तकात स्वामी विवेकानंदांवर १२५० शब्द होते. आता केवळ ३७ आहेत. आठवीच्या पुस्तकात स्वामी विवेकानंदांचा उल्लेख नाही.
> चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्लाह खान, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल,सुखदेव यांच्यासारख्या ३६ क्रांतिकारकांचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकांत नाही.