आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू पुरुष-महिलांमध्ये भेदभाव कशासाठी? : सर्वोच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदींबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी पुन्हा मंदिराच्या ट्रस्टवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले आहे की, हिंदू धर्मात महिला आणि पुरुष हे वेगवेगळे धार्मिक समूह नाहीत. हिंदू फक्त हिंदू असतो. मग तो पुरुष असो की महिला. पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव कसा होऊ शकतो, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

सबरीमाला मंदिरात मासिक धर्म असलेल्या वयाच्या महिलांना प्रवेशावर बंदी आहे. ही बंदी हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. जर एखाद्या धार्मिक समूहाला मंदिरात जाण्याची परवानगी असेल तर महिलांच्या प्रवेशावर बंदी का, असा प्रश्न न्यायालयाने मंदिर प्रशासनाला विचारला. न्यायमूर्ती दीपक मिश्र यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ पुढील सुनावणी १८ एप्रिलला करणार आहे.
दरम्यान, सबरीमाला मंदिर ट्रस्ट आणि केरळ सरकार यांनी युक्तिवाद केला की, मंदिरातील देव ब्रह्मचारी आहे. त्यामुळे १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास पावित्र्यात बाधा येऊ शकते. त्यावर, ‘फक्त परंपरेच्या आधारावर महिलांना मंदिर प्रवेश करण्याचा त्यांचा घटनात्मक हक्क नाकारणे योग्य आहे का?’ असा प्रश्न न्यायालयाने विचारला.
यापूर्वीही फटकारले होते
या प्रकरणी न्यायालयाने सोमवारीही ट्रस्टला फटकारले होते. परंपरा घटनेपेक्षा मोठ्या आहेत काय, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. सबरीमालामध्ये महिलांना प्रवेश बंदीचे हे प्रकरण १० वर्षांपासून न्यायालयाच्या विचाराधीन आहे.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदींबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी पुन्हा मंदिराच्या ट्रस्टवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले आहे की, हिंदू धर्मात महिला आणि पुरुष हे वेगवेगळे धार्मिक समूह नाहीत. हिंदू फक्त हिंदू असतो. मग तो पुरुष असो की महिला. पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव कसा होऊ शकतो, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
सबरीमाला मंदिरात मासिक धर्म असलेल्या वयाच्या महिलांना प्रवेशावर बंदी आहे. ही बंदी हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. जर एखाद्या धार्मिक समूहाला मंदिरात जाण्याची परवानगी असेल तर महिलांच्या प्रवेशावर बंदी का, असा प्रश्न न्यायालयाने मंदिर प्रशासनाला विचारला. न्यायमूर्ती दीपक मिश्र यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ पुढील सुनावणी १८ एप्रिलला करणार आहे.
दरम्यान, सबरीमाला मंदिर ट्रस्ट आणि केरळ सरकार यांनी युक्तिवाद केला की, मंदिरातील देव ब्रह्मचारी आहे. त्यामुळे १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास पावित्र्यात बाधा येऊ शकते. त्यावर, ‘फक्त परंपरेच्या आधारावर महिलांना मंदिर प्रवेश करण्याचा त्यांचा घटनात्मक हक्क नाकारणे योग्य आहे का?’ असा प्रश्न न्यायालयाने विचारला.

यापूर्वीही फटकारले होते
या प्रकरणी न्यायालयाने सोमवारीही ट्रस्टला फटकारले होते. परंपरा घटनेपेक्षा मोठ्या आहेत काय, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. सबरीमालामध्ये महिलांना प्रवेश बंदीचे हे प्रकरण १० वर्षांपासून न्यायालयाच्या विचाराधीन आहे.
बातम्या आणखी आहेत...