आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Cabinet Reshuffle Why Gowda Gone And Suresh Prabhu Became Raliway

सुरेश प्रभूंनी पदभार स्विकारला, जाणून घ्या मोदींना का बदलावे लागले रेल्वे मंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे भवनमध्ये जाऊन रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्विकारला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत बातचित केली, ते म्हणाले रेल्वेला सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये अधिक महत्त्वपूर्ण आणि कार्यक्षम बनवले जाईल. तुमची प्राथमिकता कोणत्या कामांना असेल या प्रश्नावर त्यांनी माझ्या पेक्षा माझे काम अधिक बोलेल असे उत्तर दिले. रेल्वे मंत्रालयाचे काम पाहाणे हेच त्यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. कारण, काम न केल्यामुळेच सदानंद गौडा यांच्याकडील रेल्वे खाते प्रभूंकडे आले आहे. याआधी मोदींच्या मंत्रिमंडळात सदानंद गौडा यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मोदींच्या पद्धतीने काम करण्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. जवळपास एक महिन्यापूर्वी गौडा यांनी भारतीय रेल्वे पर्सनल सर्विसमध्ये एका अधिकार्‍याची रेल्वे बोर्डाच्या एका महत्त्वाच्या पदावर आणि गोपनीय पथकाचे प्रमुख नेमले होते. मात्र, लिखित आदेश असतानाही नोकरशाहीने या आदेशाचे पालन केले नाही आणि ते पद अजूनही रिक्त आहे.
अशीही चर्चा आहे, की पंतप्रधान मोदींनी गौडा यांना 30 महत्त्वाच्या कामांची यादी दिली होती. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) या कामांवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यात सकारात्मक प्रगती दिसत नसल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांनीही गौडा यांना याबद्दल सतर्क केले होते.
गौडा यांना आता कायदेमंत्री करण्यात आले आहे. ते रेल्वे मंत्री असताना ज्या मुद्यावर काही विशेष काम करु शकले नाही त्यात मधेपुरा आणि मथुरा येथे लोकोमोटिव कंपनीची स्थापना, रेल्वेत एफडीआय आणि रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा देण्याचे काम पूर्ण झालेले नाही.
पंतप्रधानांनी सुरेश प्रभूंवर विश्वास व्यक्त करण्याचे कारण असे सांगितले जात आहे, की प्रभू हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. मोदींना विश्वास आहे, की प्रभू रेल्वेमधील नोकरशाहीच्या मुळावर घाव घालतील आणि रेल्वेचे ब्रँड अॅम्बेसिडर बनत रेल्वेत नवे बदल घडवून आणतील. मोदींचे बुलेट ट्रेनचे स्वप्न देखील प्रभू पुर्ण करतात का हे पाहावे लागणार आहे.