आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाशी न देण्याच्या अटीवरच इटलीचे खलाशी भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय मच्छीमारांच्या हत्येचा आरोप असलेले दोन्ही इटालियन खलाशी शुक्रवारी अखेर भारतात परतले. त्यांच्यासोबत इटलीचे परराष्ट्र राज्यमंत्री स्टीफन डी मिस्तुराही दिल्लीत दाखल झाले आहेत. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय असल्याचे म्हटले आहे. परंतु या खलाशांना परत आणण्यासाठी भारत सरकारने इटलीच्या चार अटी मान्य केल्या आहेत. त्यामध्ये हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही या खलाशांना फाशीची शिक्षा होणार नाही, या महत्त्वाच्या अटीचा समावेश आहे.

हत्येच्या प्रकरणात फाशीच्या शिक्षेबाबत इटलीला काही शंका होत्या. मच्छीमारांची हत्या 'रेअर ऑफ द रेअरेस्ट' र्शेणीमध्ये येत नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे भारताकडून इटलीला सांगण्यात आल्याचे खुर्शीद यांनी संसदेत सांगितले. या दोन्ही खलाशांना परतण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत 22 मार्च रोजी संपत होती. तत्पूर्वी मतदानासाठी मायदेशी परतलेल्या खलाशांना पुन्हा पाठवण्यास इटलीने नकार दिला होता.

सौदेबाजीसाठी वाद आवश्यकच होता : इटली- खलाशांना परत भारतात पाठवण्याच्या मुद्दय़ावरून आम्ही जाणीवपूर्वक वाद वाढवला होता. फाशीची शिक्षा मिळू नये यासाठीच हे प्रयत्न होते आणि ते यशस्वीही झाले, अशी प्रतिक्रिया इटलीचे परराष्ट्रमंत्री गिउलिओ यांनी तेथील मीडियाशी बोलताना दिली.