आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट 'कंट्रोल'चा प्रयत्न का नाही ? खासदार गांधींचा केंद्राला बाउन्सर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी बुधवारी पुन्हा लोकसभेला अवाक् केले. गारपिटीला "कंट्रोल' करण्यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला. या अनपेक्षित प्रश्नाने सत्ताधारीच काय पण विरोधी बाकांवरील खासदारही चांगलेच बुचकळ्यात पडले आणि सगळ्यांच खासदारांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असून यामुळे उभी पिके नष्ट होत आहे. यामुळे चिंताक्रांत असलेल्या दिलीप गांधी यांनी केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांना गारपीटी रोखण्याबाबतचा प्रश्न विचारला. त्याला उत्तर तरी काय द्यावे, अशा विचारमुद्रेत हर्षवर्धन यांनी गारपीट वा भूकंप टाळण्याचे तंत्रज्ञानापर्यंत अद्यप विज्ञानाची "प्रगती' झाली नसल्याचे म्हणत बाजू सावरली.

दिलीप गांधींचा सवाल
आजवर शेतकरी, मच्छीमारांनासाठी पाऊस वा वादळांची पूर्वसूचना दिली जाते. मात्र तुम्ही (सरकार) गारपीट नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेवर काम करत नाही, जेणेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल? तुमचे मंत्रालय या दिशेने प्रयत्न करत आहे का?